esakal | परप्रांतीयांच्या घरवापसीसाठी धावल्या इतक्या रेल्वे
sakal

बोलून बातमी शोधा

138 trains ran for return of workers

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात अडकून राहिलेल्या परप्रांतीय प्रवाशांसाठी मध्ये रेल्वेच्या पुणे विभागातून तब्बल 138 विशेष श्रमिक रेल्वे धावल्या.

परप्रांतीयांच्या घरवापसीसाठी धावल्या इतक्या रेल्वे

sakal_logo
By
शंकर भोसले

मिरज (जि . सांगली)  : कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात अडकून राहिलेल्या परप्रांतीय प्रवाशांसाठी मध्ये रेल्वेच्या पुणे विभागातून तब्बल 138 विशेष श्रमिक रेल्वे धावल्या. यातून सुमारे दीड लाख प्रवासी स्वराज्यात पोहोचू शकले. यामध्ये कोल्हापूर स्थानकातून 25 गाड्या, मिरज स्थानकातून 10 गाड्या, सातारा स्थानकातून 14 आणि पुणे रेल्वे स्थानकातून तब्बल 77 रेल्वे गाड्या महिनाभरात रवाना झाल्या. यावेळी रेल्वेकडून शासकीय यंत्रणेच्या सहाय्याने उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, पश्‍चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड या राज्यांमधील महाऱाष्ट्रात रोजगार, शिक्षण आणि पर्याटनासाठी दर्शनासाठी आलेल्या 1 लाख 70 हजार परप्रांतीय प्रवाशांना रेल्वेच्या विशेष श्रमिक ऐक्‍सप्रेसच्या ऑपरेशनमुळे स्वगृही जाता आले. 

यासाठी रेल्वेच्या वाणिज्य विभागापासून ते तिकीट तपासणी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची वैद्यकीय तपासणी, तिकीट तपासून रेल्वे बोगीमध्ये सोडण्याची व्यवस्था केली होती. या प्रवाशांसाठी जिल्हा प्रशासनाकडून देखील ऑनलाईन नोंदणी व्यवस्था उत्कृष्टरीत्या राबवल्यामुळे हे सर्व प्रवासी स्वगृही परतले. बिहार उत्तर प्रदेश, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान येथील कामगारांसाठी देखील वातानुकूलित गाड्यांची सोय करण्यात आली होती. या प्रवाशांना रवाना करण्यासाठी तिकिटाची व्यवस्था मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आली. परप्रांतीय आपल्या इच्छीत स्थळी पोहोचण्यास 24 तासांहून अधिक कालावधी लागत असल्यामुळे प्रवाशांच्या पोटभर खाण्याची आणि शुद्ध पाणी देण्याची व्यवस्थाही स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली होती. 

राज्ये आणि श्रमिक रेल्वे 
सर्वाधिक रेल्वे मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार येथे गेल्या; तर काही गाड्या पश्‍चिम बंगाल, झारखंड, ओरिसा, छत्तीगड, राजस्थान या ठिकाणी रवाना झाल्या. 

स्थानक आणि गाड्या 
कोल्हापूर : 25 
मिरज : 10 
सातारा : 14 
पुणे : 77 

आजपासून मिरेजतून दोन गाड्या 
1 जूनपासून सुरू केलेल्या रेल्वेमध्ये मिरज स्थानकातून गोवा ते निजामुद्दीन आणि यशवंतपूर ते निजामुद्दीन या दोन गाड्या नियमित सुटणार आहेत. मात्र या गाड्यांचे राज्य अंतर्गत आरक्षण मिळणार नाही, पण राज्याबाहेर जाता येऊ शकेल.