सहा महिन्यात 14 हजार किलो प्लास्टिक जप्त

plastic
plastic

सोलापूर : बंदी असतानाही प्लास्टिक पिशव्यांचा वापर व साठा  करणाऱ्या 189 जणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 23 जून 2018 ते 23 जून या सहा महिन्यात ही कारवाई झाली. या कालावधीत सुमारे 14 हजार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. 

परवाना विभागाचे अधीक्षक अनिरुद्ध आराध्ये, निरीक्षक केदार गोटे, श्रीराम कुलकर्णी सूर्यकांत लोखंडे व दत्ता गायकवाड यांनी ही कारवाई केली. दरम्यान, प्लास्टिकच्या कोणत्याही प्रकारच्या वस्तू आढळणाऱ्या दुकानांचा परवाना रद्द करावा, असे आदेशवजा पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई रवींद्रन यांनी पाठविले आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येत असल्याचे आराध्ये यांनी सांगितले. 

प्लास्टिकबंदी मोहिमेंतर्गत जप्त करण्यात आलेले 13 हजार 907 किलो प्लास्टिकचे पुनर्चक्रीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने पुनर्प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांची यादी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मागविली आहे.  महापालिका अन्न व परवाना विभागाच्या पथकाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने दिवाळीच्या कालावधीत विशेष मोहीम राबवीत फराळ विक्रेते आणि फटाके विक्रीची दुकाने तपासण्यात आली.

प्लास्टिक आढळलेल्या दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला. आता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य कार्यालयाकडूनच परवाना रद्दचे फर्मान निघाल्याने त्याची काटेकोरपणे कारवाई केली जाणार आहे. व्यापाऱ्यांकडून कॅरिबॅग व नॉन ओव्हन पिशव्या जप्त करण्यात आल्या. दंडात्मक आणि जप्तीची कारवाई सुरू असतानाही अनेक दुकानांमध्ये प्लास्टिक आढळून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने तपासणीची मोहीम तीव्र केली आहे. प्लास्टिक आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे. 

कालावधी : 23 जून 18 ते 23 जानेवारी 19 
दुकाने तपासली : 3392
दंडात्मक कारवाई : 189 
एकूण दंड वसूल : 9.95 लाख रुपये 
प्लास्टिक जप्त : 13 हजार 907 किलो 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com