उजनी जलाशयात सापडला 14 किलोचा वडशिवडा जातीचा मासा

fish
fish

केतूर (सोलापुर) : एकेकाळी उजनी जलाशयाच्या अथांग गोड्या पाण्यातील चवदार माशांचे सर्वात मोठे आगार म्हणून ओळखले जात होते.परंतु जलाशयात वाढते प्रदूषण तसेच परप्रांतीय मच्छीमारांकडून बेसुमार होत असलेली बेकायदेशीर मच्छीमारी या पार्श्वभूमीवर जलाशयातील अस्सल चवीचे गावरान मासे कधीच गायब व नामशेष झाले.

मात्र सध्याची दुष्काळी परिस्थिती पाण्याला वाढलेली मागणी यामुळे उजनी जलाशयाला नाल्याचे आलेले स्वरूप या पार्श्वभूमीवर केतूर ( ता.करमाळा) येथील मच्छीमार धनंजय पतुले यांना पोमलवाडी -केतूर जुन्या पाचपुलाजवळील शिवारातील जलाशयात मच्छिमारी करताना वडशिवडा जातीचा १४ किलोचा चवदार समजला जाणारा वडशिवडा जातीचा मासा सापडला.

"उजनी जलाशयात अवाढव्य पाणीसाठा असताना चिलापी जातीशिवाय सापडत मासाच मच्छिमारांना सापडत होता परंतु जलाशयात पाणी अत्यल्प पाणीसाठाच शिल्लक राहिल्याने आता या पाण्यात काही प्रमाणात चवदार मासे सापडू लागले आहेत.

पतुले यांनी सदर मासा भिगवण मच्छी मार्केटला (ता.इंदापूर) येथे विक्रीसाठी नेला होता. तेथील व्यापारी चौधरी यांनी २५० रुपये प्रति किलो प्रमाणे तो विकत घेतला त्यामुळे केवळ एका माशाचे पतुले यांना साडेतीन हजार रुपये मिळाले.

"उजनी जलाशयात वरचेवर वाढणाऱ्या प्रदुषणामुळे जलाशयातील मत्ससंपदेबरोबरच जैवसंपदेलाही ग्रहण लागले अाहे.वाढत्या प्रदूषणाबाबत शासनाची वाढत्या अनास्था पाहता पर्यावरण प्रेमींनी एकत्र येत याबाबत आवाज उठविणे काळाची गरज आहे. अन्यथा जलाशयातील पाणी स्वच्छ करणारे मासेच यापुढील काळात जलाशयात दुर्मिळ म्हणून गणले जातील."
- कल्याणराव साळुखे,पर्यावरणप्रेमी,कुंभेज (ता.करमाळा)

"अथांग व्याप्ती असलेल्या उजनी जलाशयात कित्येक प्रकारचे मासे आढळतात. पतुले यांना आढळलेला माशाला  कॅट फिश (Cat fish) म्हणून ओळखतात. त्याचे शास्त्रीय नाव वाॅलेगो अट्टु (Wallago attu) असे आहे. गोड्या पाण्यात खोलवर हा मासा  समूहाने वावरतो. उजनी जलाशयातील पाणी साठा सद्या अत्यल्प राहिल्याने हा मासा जाळ्यात अडकला आहे. वेळेत मच्छीमारांना  हा मासा सापडला नसल्याने त्याची अवाढव्य वाढ झाली आहे." 
- डाॅ. अरविंद कुंभार, प्राणिशास्त्र  प्राध्यापक, शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com