कळशीभर पाण्यासाठी पंधरा मिनीटं

अण्णा काळे
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

करमाळा : करमाळा तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसंदिवस वाढत चालली आहे.पोंधवडी( ता.करमाळा) येथे आडात येणारे पाणी भरण्यासाठी राञदिवसं ग्रामस्थ थांबलेले असतात. विशेष म्हणजे या आडाच्या तळाला एका बाजुला थोडा खड्डा आहे.त्या खड्ड्यात कळशीभर पाणी येण्यासाठी किमान 15 मिनटे लागतात.प्लॅटीकच्या पाच लिटरच्या ड्रमला दोरी लावुन ते पाणी मिळवण्यासाठी वृध्द महीला, लहान मुले -मुली राञभर अडावरच थांबत आहेत.कोर्टी पासुन पाच किलोमीटर अंतरावर पोंधवडी हे गाव आहे. 
पाणी मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष जीव घेणा आहे.राञी आडाजवळ उजेडाची कसलीच सोय नाही. राञी बॅटरी आडात दाखवुन पाणी काढवे लागते.

गावाच्या एक किलोमीटरच्या परीसरात कुठेही पाणी उपलब्ध नाही.
मनुबाई गोसावी,बायडाबाई तळेकर, निलावती गरदडे या वृध्द महीला कळकळीने पाण्याविषयीचे हाल सांगत होत्या.

तरण पोरं गाडीवर ,सायकलवर कुठुन तरी पाणी आणत्यात आम्ही म्हता-या माणसांनी कुठं जायचं, तासभर थांबल्यावर आढातुन एक हांडाभर पाणी मिळत.लय हाल हायत पाण्यासाठी आम्ही 72 चा दुष्काळी बघीतलाय तेवा सुध्दा पाण्याचं ऐवढ हाल नव्हतं.
- मनुबाई गोसावी, पोंधवडी, ता.करमाळा,जि.सोलापूर. 

पोंधवडी गावाच्या बाजुने तीन जुने आड आहेत.आडला फारच थोडे पाणी येते हे पाणी घेण्यासाठी राञदिवस लोक आडावर असतात.पाणीपुरवठा विहीर कोरडी पडली आहे. जवळ कुठेच पाणी नाही. टॅकरसाठी प्रस्ताव दिला आहे. लवकर टॅकर सुरू झाला तर लोकांचे हाल होणार नाहीत.
- रघुनाथ राऊत, पोंधवडी, करमाळा

Web Title: 15 mins wait for water