शिवसेना नेत्याच्या भावासह १६ तडीपार

Tadipar
Tadipar

सांगली - इस्लामपूर परिसरात मटका-जुगार अड्डे चालवल्या प्रकरणी शिवसेना नेत्याच्या भावासह १६ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. त्या सर्वांना सांगलीसह सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतून तडीपार  करण्यात आले आहे. 

पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी या कारवाईने राजकीय लागेबांधे असलेल्या काळ्या धंद्यांना मोठा दणका दिल्याचे जोरदार चर्चा आहे. तडीपार केलेल्या टोळीविरुद्ध २०१५ पासून मटका  आणि जुगाराचे गुन्हे दाखल आहेत. संघटित टोळीच्या गुन्हेगारीमुळे परिसरात सामाजिक, कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या होत्या. टोळीप्रमुख व साथीदार अवैध मार्गाने पैसा मिळवून त्याद्वारे गुंडगिरी करीत होते.  महिला, शाळकरी मुली यांना या टोळक्‍यांचा त्रास होत होता. त्यामुळे अधीक्षक शर्मा यांनी ताडीपारी केली.  त्यात शिवसेना नेत्याच्या भावाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजकीय लागेबांधे असलेल्या काळ्या धंद्यांना जिल्ह्यात मोठा दणका आहे. अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी कारवाई केली.

दुसरी टोळी
रणजित भीमराव शिंदे (वय ३०, रा. इस्लामपूर, मूळ गाव कापूरवाडी), बजरंग हणमंत माळी (वय ३५, रा. हनुमाननगर), सुलतान बादशाह मुल्ला (वय ३९, रा. शिवनगर), महादेव यशवंत धुरगुडे (वय ४९, रा. माळगल्ली), रणजित सर्जेराव गायकवाड (वय २३, रा. बुरुडगल्ली, चौघे इस्लामपूर), उत्तम रंगराव पाटील (वय ५०), पांडुरंग सदाशिव घेवदे (वय ३२), सुरेश सर्जेराव लोहार (वय ५४, तिघे रा. रेठरे धरण, ता. वाळवा)

टोळी अशी
उमेश रामचंद्र पवार (३०, रा. शिवाजी चौक), संभाजी गगनमाले (४७), बाबासाहेब माने (४०, राजाबागेश्वर), इस्माईल गुलाब खाटीक (६५), सिराज मुसा शेख (४५, रा. अकबर मोहल्ला), संजय नामदेव नागे (४३, रा. बुरुड गल्ली), प्रदीप महावीर दुगे (५४ रा. यल्लम्मा मंदिरमागे), संजय रघुनाथ पाटील (३८, रा. शिवनगर), दिनेश जगन्नाथ अवघडे (२८, रा. साठेनगर, सर्व इस्लामपूर).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com