सोलापूर महापालिकेचे 161 परवाने ऑनलाइन 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 22 जून 2018

सोलापूर : महापालिका आरोग्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या 161 व्यवसायांच्या परवाना शुल्कात 30 टक्के वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार परवाने देतानाच ते ऑनलाइन पद्धतीने देण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच हे सर्व परवाने ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. एप्रिल ते मार्च असा परवान्यांचा कालावधी असणार आहे. 

अधिनियमातील तरतुदीनुसार दरवर्षी मार्चमध्ये परवाने दिले जातात, तसेच मार्चमध्ये नूतनीकरणही करून दिले जाते. अन्न सुरक्षा व मानके कायदा अस्तित्वात आल्यापासून भेसळ प्रतिबंधक व आरोग्य परवानाविषयक कामकाज महापालिकेकडून काढून घेण्यात आले. त्यामुळे या परवान्यांपासून महापालिकेस मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या तब्बल नवीन 52 व्यवसायांची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शुल्क आकारल्यास महापालिकेस वर्षाला अंदाजे 15 ते 20 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. 

परवाना शुल्कात दर तीन वर्षांनी वाढ केली जाते. गतवर्षी 2013-14 या आर्थिक वर्षात वाढ करण्यात आली होती. त्यानुसार आता वाढ करणे आवश्‍यक असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार 2017-18 या आर्थिक वर्षापासून सध्याच्या दरात 30 टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. ही वाढ लागू झाल्यास परवाना शुल्काचे उत्पन्न वाढणार आहे. तसेच किमान सव्वापाच लाख रुपयांचे जादा उत्पन्न पालिकेस मिळणार असून, ही रक्कम 21 ते 25 लाखांपर्यंत जाणार आहे. 

आकडे बोलतात... 
------------------- 
परवानापात्र व्यवसाय - 161 
सोलापुरातील संख्या - 6964 
सध्याचे उत्पन्न - अंदाजे 16.30 लाख 
मिळणारे उत्पन्न - अंदाजे 25.10 लाख 

Web Title: 161 license of solapur municipal corporation online