

Eco-friendly Ganesh Visarjan in Satara: 17,000 idols immersed in artificial ponds, 77 tons of nirmalya collected
Sakal
सांगली: महापालिका क्षेत्रातील १७ हजारांवर भाविकांनी आतापर्यंतच्या विसर्जनाच्या तीन दिवसांत कृत्रिम कुंडात ‘श्रीं’चे विसर्जन करीत प्रदूषणमुक्त कृष्णा नदी उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला. नदीत निर्माल्य, ‘श्रीं’चे विसर्जन टाळावे, यासाठी महापालिकेसह विविध संस्था-संघटनांचे प्रयत्न आहेत. जवळपास ७७ टन निर्माल्याचे संकलन झाले आहे. ते नदीऐवजी महापालिकेकडे सोपवण्याबाबत चांगला प्रतिसाद मिळत आहे. १३९९ भाविकांनी ‘श्रीं’च्या मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करून आणखी एक पाऊल पुढे टाकले.