वर्षात १,८०२ जणांना सर्पदंश

सुनील पाटील
रविवार, 3 जून 2018

कोल्हापूर - गवत कापताना, शेतात पाणी पाजताना, मैदानावर खेळताना, बागेत फिरताना झालेल्या सर्पदंशांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी १ हजार ८०२ जणांना सर्पदंश झाला. यांपैकी १५ जणांना विषारी सर्पदंशामुळे जीव गमवावा लागल्याचे वास्तव आहे. वर्षाला १ हजार ८०० जणांना सर्पदंश होत आहे.

कोल्हापूर - गवत कापताना, शेतात पाणी पाजताना, मैदानावर खेळताना, बागेत फिरताना झालेल्या सर्पदंशांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी १ हजार ८०२ जणांना सर्पदंश झाला. यांपैकी १५ जणांना विषारी सर्पदंशामुळे जीव गमवावा लागल्याचे वास्तव आहे. वर्षाला १ हजार ८०० जणांना सर्पदंश होत आहे.

कामानिमित्त शेतात गेलेल्या किंवा गवत कापताना सर्पदंश झालेल्यांना जीव गमवावा लागला आहे. अनेक लोक येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होतात. सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. काल घानवडे (ता. करवीर) येथील सत्यम प्रभू या चारवर्षीय बालकाचा वेळीच उपचार न झाल्याने मृत्यू झाला.

त्यामुळे जि.प.च्या आरोग्य केंद्रातील सर्पदंशासाठी असणाऱ्या ॲन्टिस्नेक व्हेनम सिरम इंजेक्‍शनचाही यावर उपयोग झाला नाही. 

पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढते. नदीला पूर, महापूर आल्यानंतर गवतात किंवा शेतात बसलेले विविध साप हे जीव वाचविण्यासाठी माळरान किंवा वस्तीच्या ठिकाणी जातात. ज्या ठिकाणी पाणी नाही, अशा शेतात किंवा गवतांच्या गंजीमध्येच विसावा शोधतात. याची कल्पना आली नसल्याने अनेकांना सर्पदंश झाला आहे. ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागातील मैदानावर गवत वाढलेले असते. याच मैदानाचा आसरा घेतलेले साप मैदानावर खेळत असणाऱ्या मुलांना दंश करतात. जिल्ह्यात वर्षाला दीड हजारांहून अधिक लोकांना साप चावल्याच्या नोंदी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे आहेत.

साप चावल्यास -
देशात २३६ जातींचे साप आढळतात. यांपैकी नाग, घोणस, मण्यार, फुरसे असे विषारी साप आहेत; तर बहुसंख्य साप हे बिनविषारी आहेत. त्यामुळे साप चावल्यानंतर घाबरून न जाता प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन ॲन्टिस्नेक व्हेनम सिरम इंजेक्‍शन घ्यावे. 

देशात १ लाखांवर सर्पदंश
देशात डिसेंबर २०१७ पर्यंत १ लाख १४ हजार जणांना सर्पदंश झाला. यांत महाराष्ट्रातील ३१ हजार २४३ जणांचा समावेश आहे. राज्यातील ग्रामीण भागात १९ हजार २० जणांना व शहरी भागातील ५ हजार ४३० जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आहे.

प्रमुख जिल्ह्यांतील सर्पदंशांची संख्या -
 कोल्हापूर १८०२  नाशिक-२६००  पालघर-२३५०
 ठाणे-१३३४  रायगड-१२१७
 जळगाव-११८५  पुणे-१०९० 
 मुंबई-१३५

पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढते, यासाठी काळजी घ्यावी. दरम्यान, जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्राधिकाऱ्याला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात जि. प.च्या ७३ आरोग्य केंद्रांत २ हजार ३५७ ॲन्टिस्नेक व्हेनम सिरम इंजेक्‍शन उपलब्ध करून दिले आहेत.  
- डॉ. उषादेवी कुंभार, प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी.

Web Title: 1802 people snake bite