गगनबावडा येथे आराम बसमधून 19 लाख 50 हजाराची रोकड जप्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

कोल्हापूर - गगनबावडा तपासणी नाक्‍यावरील पोलिसांनी आज पहाटे आराम बसमधील मध्यप्रदेशातील प्रवाशाकडील 19 लाख 50 हजाराची रोकड जप्त केली. संतोषकुमार परमलाल पटेल (रा. हराये, छिंद्वाडा, मध्यप्रदेश) असे त्यांचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सापडलेल्या या रक्केमबाबचची आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे. 

लोकसभा निवडणुकच्या अनुषंगाने कोल्हापूर पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाने प्रत्येक शहरात, गावात तपासणी नाके तैनात केली आहेत. या नाक्‍यावरून मद्य, पैशाच्या तस्करीसह गुन्हेगारांवर नजर ठेवली जाते. गगनबावडा येथील वनरक्षक चौकीततील तैनात पोलिसानी आज पाहटे एका आराम बसची तपासणी केली. यात एका प्रवाशाच्या बॅगेत तब्बल 19 लाख 50 हजाराची रोकड मिळून आली. पथकाने संबधित प्रवाशाकडे चौकशी केली. त्यात तो मध्यप्रदेशचा असून त्याचे नाव संतोषकुमार पटेल असल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन ऐवढी मोठी रोकड कोठून आणली, ती कशासाठी बाळगली याची चौकशी सुरू केली आहे. त्याचबरोबर याची माहिती पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही कळवली आहे. याबाबत त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. 

Web Title: 19 lakh 50 thousand rupees were seized from Travels at Gaganbawda