सांगलीत 19 लाखांची रोकड जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

सांगली - माधवनगर-कर्नाळ रस्त्यावर महिला उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या पथकाने बुधवारी (ता.16) रात्री एका शेतकऱ्याच्या मोटारीतून 19 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली. या प्रकरणी सुभाष चवगोंडा पाटील (रा. दुधगाव, ता. मिरज) या शेतकऱ्याची चौकशी सुरू केली आहे. ही रक्कम पाटील याची नसून अन्य कोणाची तरी असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पोलिस आणि प्राप्तिकर विभागाच्या चौकशीकडे लक्ष लागले आहे. 

माधवनगर येथून कर्नाळमार्गे एका मोटारीतून रक्कम जात असल्याची माहिती उपाधीक्षक डॉ. काळे यांच्या पथकाला काल रात्री मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने रात्री दहाच्या सुमारास या रस्त्यावर सापळा रचला. या मोटारीची झडती घेतल्यानंतर आतमध्ये 500 रुपयांची 38 बंडले आढळली. 19 लाखांची रोकड मिळाल्यानंतर संजयनगर पोलिस ठाण्यात पाटील याची चौकशी करण्यात आली. त्याने ही रक्कम हळदीच्या व्यवहारातून मिळाल्याचे सांगितले. हळद कोणत्या गोदामात ठेवली होती, याचीही पोलिस तपासणी करत आहेत. संशयित पाटील याला खुलासा करण्यासाठी नोटीस बजावली आहे. चौकशीनंतर गुन्हा दाखल केला जाणार आहे. 

रकमेबाबत गूढ 

पाटील याने प्राथमिक टप्प्यात दिलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोणाचा तरी "ब्लॅक मनी' व्हाइट करण्यासाठीही रोकड पाठवली जात असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे तपासाकडे लक्ष लागले आहे.

Web Title: 19 lakh cash seized Sangli