पानसरे हत्येप्रकरणी दोघेजण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी भारत कुरणे व वासुदेव सूर्यवंशी या दोघांना कोल्हापूर एसआयटीने बंगळूर कारागृहातून काल रात्री ताब्यात घेतले. सकाळी त्यांना प्रचंड पोलीस बंदोबस्तात सीपीआर हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. जवळपास दीड तास झालेल्या वैद्यकीय तपासणीनंतर त्या दोघांना अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहे. दुपारी दीडच्या सुमारास त्यांना जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

पानसरे हत्या प्रकरणी संशयित अमोल काळेची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची पुन्हा बंगळूर कारागृहात रवानगी करण्यात आली.

अमोल काळेची न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच एसआयटीने भारत कुरणे व वासुदेव सूर्यवंशी या दोघांना कारागृहातून ताब्यात घेतले या दोघांना या आधी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने अटक केले आहे.

भारत कुरणे व वासुदेव सूर्यवंशी यांना आज जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. अॅड. शिवाजीराव राणे सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करणार आहेत. अमोल काळेवरील कारवाईनंतर या दोघांना तात्काळ ताब्यात घेतल्याने या प्रकरणात महत्वपूर्ण माहिती समोर आल्याची शक्यता आहे. सरकारी पक्षाचे युक्तिवादादरम्यान या बाजू न्यायालयासमोर मांडल्या जाऊ शकतात.

Web Title: 2 arrested for Govind Pansare murder case