अथणी सहाय्यक परिवहनाला 2 कोटीचा फटका; 22 कोटीची उदिष्ट्यपूर्ती

येथील सहाय्यक परिहन कार्यालयामुळे नागरिकांसह वाहनधारकांची सोय झाली आहे.
athani rto office
athani rto officesakal media

अथणी : येथे सहाय्यक परिवहन कार्यालय स्थापन होऊन 15 महिने झाले. कोरोनामुळे शासनाने दिलेले उदिष्ट्येपूर्ती पूर्ण झाली नाही. 24 कोटीचे उदिष्ट्ये असताना 22 कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. 2 कोटीचा फटका बसला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 15 महिन्यात 25 कोटी 70 लाख 91 हजार 496 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आतापर्यंत 6600 दुचाकी, 424 ट्रक तर 528 चारचाकी वाहनांचे पासिंग झाले आहे.

athani rto office
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर सहा वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर

येथील सहाय्यक परिहन कार्यालयामुळे नागरिकांसह वाहनधारकांची सोय झाली आहे. चिक्कोडीचा फेरया वाचत आहेत. या कार्यालयास अथणी, कागवाड, रायबाग, कुडची विधानसभा मतदार संघातील तालुके येत आहेत. प्रत्येक महिन्यात 2 कोटीच्यावर उत्पन्न हवे आहे. 15 महिन्यात 30 कोटी उत्पन्न आवश्यक असून ते 25 कोटी 70 लाखावर आले आहे. सहाय्यक परिवहन कार्यालयाच्या नियंत्रणाखाली येणारया गावात वाहनांची उलाढाल ठप्प झाली आहे. अतिवृष्टी, महापुराचा फटका बसला आहे.

athani rto office
Netflix सीरिज Squid Gameने मोडले विक्रम; ठरतेय सर्वाधिक लोकप्रिय

नवीन वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल कमी आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. येथील सहाय्यक परिवहन कार्यालयास कायमस्वरुपी वाहन निरीक्षक नाही. बागलकोट, जमखंडी, गोकाक, चिक्कोडी, बेळगाव येथून आठ दिवसाला एक निरीक्षक येत आहेत. त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. रायचूर येथील वाहतूक निरीक्षक जी. पी. विशाल यांच्याकडे कारभार आहे. कर्नाटक, महाराष्ट्राच्या सीमेवर कार्यालय असल्याने महाराष्ट्रातून विना परवाना वाहनांची संख्या अधिक आहे. वाहनांची तपासणी होत नसल्याने कारवाई अशक्य आहे. त्यामुळे येथे कायमस्वरुपी कर्मचारी नेमण्याची मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com