जतजवळ जिलेटीनच्या कांड्या जप्त; दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

जत शहरातील वाढती घरफोडी, दुकानफोडी तसेच पवनचक्की कंपनीच्या केबल चोरीच्या वाढत्या घटनेमुळे चोरटयांनी जत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. जत पोलिसांकडे पुरेसा फौजफाटा नसल्याने चोरटयांचे चांगलेच फावले होते.

जत : जतमधील एका तांडयावर पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन करत काही जिलेटीनच्या कांड्या जप्त केल्या असून, दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. जिलेटीनच्या कांडया, गॅस कटरसह घरफोडी, दुकानफोडीचे साहित्य जप्त, सहा संशयित मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातील जत शहरातील सातारा रोड व उमराणी रोडवर असलेल्या दोन्ही पारधी तांडयावर पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास एकाच वेळी कोबिंग ऑपरेशन राबविले. कोबिंग ऑपरेशन दरम्यान उमराणी रोडवरील तांडयातील शिवाजी प्रल्हाद चव्हाण व संतोष प्रल्हाद चव्हाण या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या घराची कसून झडती घेतली असता एका पोत्यात जिलेटीन कांडया, गॅस टाकी, गॅस कटरसह घरफोडी, दुकानफोडी तसेच पवनचक्कीचे केबल कट करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले. उमराणी रोडवरील तांडयातच सांगली, सोलापूर, कोल्हापूरसह कर्नाटकातील सहा मोटर सायकली मिळून आल्या असून पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत.

जत शहरातील वाढती घरफोडी, दुकानफोडी तसेच पवनचक्की कंपनीच्या केबल चोरीच्या वाढत्या घटनेमुळे चोरटयांनी जत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. जत पोलिसांकडे पुरेसा फौजफाटा नसल्याने चोरटयांचे चांगलेच फावले होते. वाढत्या चोरीला आळा घालण्यासाठी तसेच तपासासाठी जत पोलिसांनी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे पारधी तांडयावर अतिरिक्त फौजफाटा देत कोबिंग ऑपरेशन राबवण्याची परवानगी मागितली होती. 

Web Title: 2 persons arrested for police in Jat