एसटी बस-दुचाकीच्या धडकेत दोन बहिणी ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

मसूर (सातारा) : श्यामगाव घाटातील पोलीस चौकीसमोर एसटी बसने मागील बाजूने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवरील दोन सख्या चुलत बहिणी ठार झाल्या. भूमी प्रकाश तुपे (वय 12) व संचीता विजय तुपे (वय 10, दोघी रा. कोपर्डे हवेली) असी त्यांची नावे आहेत.

लग्नानिमित्त देवदर्शन घेऊन घरी परतताना अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दुपारी बाराच्या सुमारास अपघात झाला. पोलिसांनी संगितले की, वडूज डेपोची कऱ्हाड-वडूज एसटी बस (एम एच 06 - एस 8057) कऱ्हाडहून वडूजकडे निघाली होती. त्यावेळी त्याच दिशेने निघालेल्या स्प्लेंडरला (एम.एच.05 एए 4372) श्यामगाव घाटाच्या पायथ्याच्या वळणावर एसटीची जोरात धडक बसली.

घाटातील पोलीस चौकी जवळ वळणावर बस वळताना बसच्या मागील भागाची धडक दुचाकीला बसल्याने दुचाकी चालक प्रशांत थोरात बाजूला पडला. त्याचवेळी संचिता व भुमी दोघीही एसटीच्या मागील भागावर डोके आपटल्याने गंभीर जखमी झाल्या. त्या दोघीही रूग्णालयात नेण्यापूर्वीच ठार झाल्या. प्रशांत थोरात हा दोघीचांही मामा आहे. तोही अपघतात जखमी आहे, त्याला उपचारासाठी कऱ्हाडच्या खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. प्रशांतच्या मावस भावाचा विवाह 19 मे ला आहे त्यासाठी कुटुंबियासह देव दर्शनासाठी ते श्यामगाव येथे गेले होते. देवदर्शन होऊन परताना घटना घडली. अपघातप्रकरणी एस टी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: 2 sisters died in st two wheeler accident