
Sangli Drowning Incident : तिपेहळ्ळी (ता. जत) येथे घराजवळ खेळत असताना पाणी साठ्यासाठी केलेल्या हौदात बुडून दोन वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. निशांत नीलेश शिंदे (वय २ वर्ष, रा. तिपेहळ्ळी) असे त्याचे नाव असून शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी उघडकीस आली. या घटनेची जत पोलिस ठाण्यात नोंद झालेली आहे. महिन्याभरात ही दुसरी घटना घडली आहे.