मराठा वसतिगृहांसाठी दोन वर्षाचे वेटींग 

तात्या लांडगे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

सोलापूर : मराठा समाजाच्या मागणीनुसार आता प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्यासाठी आणखी किमान दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे. सध्या कोल्हापूरात महसूल विभागाच्या जुन्या इमारतीत राज्यातील पहिले वसतिगृह सुरु झाले आहे. त्याची क्षमता 98 असून त्याठिकाणी 28 मुलांचा प्रवेशही झाला आहे. 

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत तब्बल 10-11 महिने राज्य सरकारकडून युध्दपातळीवर हालचाली झाल्या नाहीत. त्याचा उद्रेक होऊन आता राज्यभर मराठा बांधव रस्त्यावर उतरला आहे. काहींनी आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आत्महत्याही केल्या. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह सुरु करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. परंतु, त्यासाठीच्या सर्व आवश्‍यक त्या प्रक्रिया पूर्ण करुन संबंधित जागेवर वस्तीगृहाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दोन वर्ष वाट पाहावी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 ऑगस्टपर्यंत सोलापुरातील वस्तीगृहाची प्रक्रिया पूर्ण होईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, अद्यापही जागा निश्‍चित झालेली नाही. 

वसतिगृहांची जिल्हानिहाय स्थिती 
कोल्हापूरनंतर आता पुण्यातील वसतिगृहासाठी जागा पाहण्यात आली आहे. तसेच नाशिक, उस्मानाबाद, नागपूर, औरंगाबाद, सांगली या जिल्ह्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्याठिकाणी नव्या जागा निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरु असून काही ठिकाणी पडून असलेल्या शासकीय इमारतींचाही शोध घेतला जात आहे. 

शासनाच्या ताब्यातील जागा चकाचक केल्या जात आहेत. मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह सुरु करण्याच्यादृष्टीने युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्याठिकाणी अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत इमारती बांधून त्या खासगी संस्थेकडे निवीदेद्वारे सोपविल्या जाणार आहेत. त्याकरिता दोन वर्षाचा कालावधी लागेल. 
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

Web Title: 2 years waiting for maratha hostel