'पोखरापूर'च्या कामासाठी 20 कोटी रुपये द्यावेत: सतीश काळे

राजकुमार शहा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मोहोळ (सोलापूर): शेतकऱ्यांच्या जिवनात हरितक्रांती घडविणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजनेअंतर्गत पोखरापूर क्र दोनच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी 20 कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी भाजपाचे मोहोळ तालुका अध्यक्ष सतीश काळे यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, 1995 साली युती शासनाच्या काळात आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली या योजनेचे सुमारे 70 टक्के काम पुर्ण झाले असून या माध्यमातुन शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे याचा लाभ आज शेतकऱ्यांना होत आहे. याच योजनेचे टप्पा क्र दोन चे काम अपुर्ण आहे या परिसरातील शेतकरी सातत्याने ही योजना पुर्णत्वासाठीची मागणी करीत आहेत या योजनेच्या पंपग्रहाच्या कामास स्थायी समितीमधे मंजुरीही मिळाली आहे. ही योजना कार्यान्वयासाठी स्थापत्य यांत्रिकी व विद्युत कामे अपुर्ण आहेत त्या कामासाठी सुमारे वीस कोटी रुपये निधी लागणार असून, सुधारीत मान्यतेसाठी संबधीत विभागाकडे प्रस्ताव ही सादर केला आहे. ही कामे पुर्ण झाली तर सारोळे खवणी पोखरापूर व मोहोळ या गावातील 1500 एकर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. त्यामुळे निधी मंजुर करावा अशी मागणी केली आहे.

या कामाच्या मंजुरीसाठी येत्या आठवड्यात शेतकरी शिष्टमंडळ घेऊन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातुन जलसंपदा व मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे काळे यांनी सांगीतले.

Web Title: 20 crores should be given for the work of Pokharpur: Satish Kale