हिरवा बेदाणा २०० रुपये किलो

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

यावर्षीचा सर्वाधिक दर ः ६५० टन आवक, ४४७ टनांची विक्री
तासगाव - तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज झालेल्या सौद्यांत हिरव्या बेदाण्याला प्रतिकिलो २०० रुपये दर मिळाला. हा यावर्षीचा सर्वाधिक दर आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बेदाणा हंगाम उशिरा सुरू झाला आणि आवक कमी झाल्याचे चित्र आहे. आज ६५० टन बेदाण्याची आवक झाली.

आज सकाळी अकरापासून तासगाव बेदाणा बाजारपेठेत सौदे सुरू झाले. बाजार आवारात सौद्यांच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी गर्दी केली. सुरवातीला क्रमांक दोनचे सौदे झाले. दुपारच्या झालेल्या सौद्यांत भूपाल पाटील यांच्या श्री धारेश्‍वर ट्रेडिंग कंपनी दुकानात भरत सीताराम हसबे (हिवरे, ता. खानापूर) यांच्या ४५० किलो हिरव्या बेदाण्याला २०० रुपये दर मिळाला. रोहिणी ट्रेडिंग कंपनी यांनी तो खरेदी केला. यावर्षीच्या हंगामातील हा सर्वाधिक दर आहे.
आज दिवसभर ६५ गाडी (६५० टन) बेदाण्याची आवक झाली. ४४ गाडी (४४७ टन) बेदाण्याची विक्री झाली. आजच्या सौद्यात हिरवा बेदाणा ९५ ते २०० रुपये, पिवळा बेदाणा ९० ते १३५, तर काळ्या बेदाण्याला सरासरी २५ ते ६० रुपये दर मिळाला. हंगाम उशिरा सुरू झाल्याचे चित्र आहे. द्राक्षांना भारतीय व परदेशात दर चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल द्राक्ष विक्रीकडे आहे. बेदाणा बाजारपेठेत आवक अतिशय कमी असल्याचे दिसते आहे. सध्या नव्या बेदाण्याचे सौदे प्रत्येक दुकानात सुरू झाले आहे. कर्नाटक, सीमावर्ती भागातील बेदाण्याला चांगला दर मिळताना दिसत आहे. राज ट्रेडर्सचे राजेंद्र माने म्हणाले, ‘‘चांगल्या बेदाण्याला चांगला दर आहे. ते टिकूनही आहेत.’’

Web Title: 200 rs. kg. green bedana