सोलापूर जिल्ह्यात 200 शाळांची मुख्याध्यापक पदे रिक्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या जवळपास 200 शाळांमध्ये मुख्याध्यापकांचे पद रिक्त आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. एवढेच नाही तर शाळेतील प्रशासकीय कामाचाही खोळंबा झाला आहे. 

शालेय व्यवस्थापनाचा कणा म्हणून मुख्याध्यापकांकडे पाहिले जाते. जिल्ह्यातील सुमारे 200 ते 300 शाळेत मुख्याध्यापकच कार्यरत नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना पदोन्नती दिलेली नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांची जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. 

शाळेच्या प्रशासनाची जबाबदारी मुख्याध्यापकावर असते. नवनवीन उपक्रम राबविणे, शाळेची सर्व माहिती प्रशासनाला पुरविणे, सहशिक्षकावर नियंत्रण ठेवणे, शैक्षणिक उठावातंर्गत निधी गोळा करणे यासारखी जबाबदारीची कामे मुख्याध्यापकांना करावी लागतात. त्यांना शिकविण्यास वर्ग नसतो. परंतु, मुख्याध्यापक नसल्याने ही जबाबदारी वर्ग शिक्षकावर पडते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होऊ लागला आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्ता वाढीस लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून इंग्रजी माध्यमातील मुले जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळू लागली आहेत. ही सकारात्मक गोष्ट घडत असताना मुख्याध्यापकांची पदे रिक्त ठेवणे योग्य नाही. ती पदे तातडीने भरण्याची मागणी शिक्षक संघाने निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवानंद भरले, विठ्ठल काळे, रावसाहेब जाधवर, शिवाजी पाटील, नामदेव वसेकर, दत्ता माळी, संभाजी फुले, रेवणसिद्ध हत्तुरे, सूर्यकांत हत्तुरे, राजकुमार बिज्जरगी, उमेश पाटील, प्रदीप अवताडे, रमेश शिंदे उपस्थित होते. 

जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त असलेली मुख्याध्यापकांची पदे त्वरित भरण्यात यावीत. ती पदे भरल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम काहीअंशी कमी होण्यास मदत होईल. 
- शिवानंद भरले, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ

Web Title: 200 vacancy of principal in solapur district