स्थानिक संस्था निवडणूक; बेळगाव जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक जागा | BJP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

स्थानिक संस्था निवडणूक; बेळगाव जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक जागा

बेळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत (Election) भाजपने सर्वाधिक १०९ जागा पटकाविल्या. त्यापाठोपाठ कॉंग्रेसचे ९७ उमेदवार निवडून आले. धजदला केवळ एक जागा मिळाली. तर उर्वरित सीपीआय, बीएसपी, एनसीपी, केआरएस व एमआएम पक्षाला भोपळाही फोडता आला आहे. यामुळे प्रादेशिक पक्षांना मतदारांनी नाकारले. दरम्यान, निवडणुकीत ९४ अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. (Belgaon Election Updates)

जिल्ह्यातील १६ स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी २७ डिसेंबरला चुरशीने मतदान झाल्यामुळे निकालाकडे गुरुवारी (ता.३०) सकाळपासून साऱ्यांचे लक्ष लागून होते. तालुकास्तरावर सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. सकाळी दहा वाजल्यानंतर निकाल घोषित होण्यास सुरु झाले. यानुसार जल्लोष आणि गुलालाची उधळून विजयी उमेदवारांनी सुरु केली. दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल घोषित झाला आणि कलही स्पष्ट झाला.

हेही वाचा: भरदिवसा घरात मुलांना बांधून ठेवले; महिलेवर वार करुन पळवले साडेचार लाख

भाजपचे सर्वाधिक उमेदवार बेळगाव जिल्ह्यात निवडून आले आहेत. एकूण १०७ उमेदवारांनी ‘कमळ’ फुलविले. कॉंग्रेसची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून, एकूण ९७ उमेदवार विजयी झाले. भाजपच्या तुलनेत कॉंग्रेसची कामगिरी थोडीफार घसरली असली तरी लढा आश्‍वासक ठरला आहे. राज्यात भाजपची सत्ता आहे. जिल्ह्यातील तीन मंत्री, ३ खासदार आणि १३ आमदार भाजपचे आहेत.

त्यांच्या व्यूहरचनेला भेदून ९७ उमेदवार कॉंग्रेसचे विजयी झाले आहेत. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील ३०१ जागांसाठी निवडणूक घोषित झाली होती. यात हारुगेरी, कंकणवाडी आणि मुगळखोड स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपने कमळ फुलवले. भाजपला कौल मिळाला. एकसंबा, अथणी, ऐनापूर, उगारखुर्द येथील स्थानिक स्वराज्य संस्थेत कॉंग्रेसने यश मिळविले आहे. शेडबाळ नगरपंचायतीत एकमेव धजदचा उमेदवार विजयी झाला आहे.

हेही वाचा: पिंपरी : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल

नगर स्थानिक स्वराज्य पक्षनिहाय निकाल

नगर एकूण कॉंग्रेस भाजप अपक्ष

 • कित्तूर१८५९४

 • एम. के. हुबळी११००११

 • मुनवळ्ळी (सौदत्ती)२३१११०२

 • कल्लोळी (मुडलगी)१६०५११

 • अरभावी (मुडलगी)१६०*६ *१०

 • नागनुरी (मुडलगी)१७००१७

 • बोरगाव (निपाणी)१७००१७

 • एक्संबा (चिक्कोडी)१७१६१०

 • अथणी२७१५*९ *३

 • शेडबाळ (कागवाड)१६२११२

 • ऐनापूर (कागवाड)१९१३६ (१धजद)०

 • उगार खुर्द (कागवाड)२३११७५

 • हारुगेरी (रायबाग)२३७१५१

 • मुगळखोड (रायबाग)२२३१३६

 • चिंचली (रायबाग)१९९५५

 • कंकणवाडी (रायबाग)१७५१२०

एकूण३०१९७१०९९४

Web Title: Bjp Belgaon Election District Result

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bjpbelgaumelection
go to top