महापालिका क्षेत्रात 21 रूग्ण आढळले...सांगलीत 14, मिरजेत 6 आणि कुपवाडला एक 

घनशाम नवाथे
Monday, 20 July 2020

सांगली- महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्येने तीनशेचा टप्पा ओलांडला असताना आज आणखी 21 रूग्ण वाढले. त्यामध्ये सांगलीतील 14, मिरजेतील सहा आणि कुपवाडमधील एका रूग्णाचा समावेश आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्राची रूग्णसंख्या सायंकाळपर्यंत 353 इतकी झाली आहे. 

सांगलीत सायंकाळपर्यंत 14 रूग्ण आढळले. त्यापैकी संजयनगर परिसरात सहा रूग्ण आढळले. त्यापैकी हाडको कॉलनीतील चार आणि जगदाळे प्लॉटमध्ये दोन रूग्ण आहेत. पंचशीलनगर शिंदे मळा येथे दोन, खणभागात दोन, तसेच रेल्वे स्टेशन, गवळी गल्ली, गणेशनगर, कुदळे प्लॉट रमामातानगर येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळला.

तर मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बॉईज होस्टेल, वैद्यकीय महाविद्यालय मिरज, वाळवे गल्ली, चंदनवाडी, शिवाजी चौक, अंबिकानगर येथे प्रत्येकी एक याप्रमाणे सहा रूग्ण आढळले. तर कुपवाडमधील कापसे प्लॉटमध्ये एक रूग्ण आढळला. दिवसभरात 21 रूग्ण आढळल्यामुळे महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्या 353 इतकी झाली आहे. आज रूग्ण सापडलेल्या ठिकाणी कंटेनमेंट झोनची आखणी केली जात आहे. तसेच आरोग्य विभागाने संबंधित ठिकाणी भेटी देऊन औषध फवारणी केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 21 patients were found in the municipal area .14 in Sangli, 6 in Miraj and one in Kupwad