Rukadi News : ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारकासाठी २१० कोटींचा निधी; शासनाकडून माणगाव ग्रामस्थांच्या मागण्या मान्य

माणगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऐतिहासिक माणगाव परिषदचे राष्ट्रीय स्मारकाच्या विविध मागण्यांबाबत उपोषण करण्यात आले होते.
mp dhananjay mahadik
mp dhananjay mahadiksakal

- प्रशांत भोसले

रूकडी - माणगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऐतिहासिक माणगाव परिषदचे राष्ट्रीय स्मारकाच्या विविध मागण्यांबाबत उपोषण करण्यात आले होते. या सर्व मागण्या शासनाकडून मान्य करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते माणगाव येथील लंडन हाऊस प्रतिकृती व होलोग्राफिक शोचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे.

स्मारकाचे उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी व सोहळ्याचा २१० कोटी देण्याचे मान्य केले आहेत. या उपोषणाची सांगता खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते उपोषण करते सरपंच राजू मगदूम यांना नारळ पाणी देऊन करण्यात आली.

माणगाव (ता. हातकणंगले) येथील सरपंच डॉ. राजू मगदूम, उपसरपंच अख्तर हुसेन भालदार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि माणगावातील सर्व ग्रामस्थ यांनी माणगावच्या राष्ट्रीय स्मारकातील पहिल्या टप्प्यातील झालेल्या लंडन हाऊस आणि होलोग्रफिक-शो यांचे प्रलंबित लोकार्पण सोहळा आणि माणगाव स्मारकातील उर्वरित कामे पूर्ण करा या मागण्यांसाठी गेली दोन दिवस उपोषण केले होते.

मंगळवार (ता. १३) रोजी जिल्ह्याचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक साहेब यांनी दुपारी भेट देऊन राजू मगदूम यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती. मात्र कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय उपोषण स्थगित न करण्याची भूमिका राजू मगदूम यांनी मांडली. यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क साधून या सर्व बाबींची दखल घेण्याची विनंती केली.

दरम्यान आमदार प्रकाश आवाडे यांनीही मुख्यमंत्री कार्यालयाला पत्रव्यवहार करून लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम व स्मारकाचा आरखड्याचे २१० कोटी देनेचे मान्य केले. खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे, सहाय्यक आयुक्त सचिन साळे, तसेच सर्व अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम समावेश करण्याची विनंती मान्य केली व पुढील स्मारकाच्या आराखड्याच्या संबंधाने निधी व्यवस्थापन करण्याचे मान्य केले. तसेच राजू मगदूम यांना व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नारळ पाणी देऊन उपोषण थांबवण्याचे आवाहन केले. यानंतर राजू मगदूम यांनी उपोषण थांबवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com