सोलापूर - बार्शी बसस्थानकावरून महिलेचे 22 तोळे सोने लंपास 

सुदर्शन हांडे
शनिवार, 28 एप्रिल 2018

बार्शी : आजारी वडिलांना पाहण्यासाठी निघालेल्या महिलेच्या पर्समधील २२ तोळे सोने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. बार्शी बसस्थानकावर शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सोने गेल्याचे लक्षात येताच महिलेला धक्का बसला. बार्शी पोलिसांना तत्काळ या घटनेची माहिती संबधित महिलेने दिली. रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदविण्याचे काम सुरु होते.

बार्शी : आजारी वडिलांना पाहण्यासाठी निघालेल्या महिलेच्या पर्समधील २२ तोळे सोने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. बार्शी बसस्थानकावर शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सोने गेल्याचे लक्षात येताच महिलेला धक्का बसला. बार्शी पोलिसांना तत्काळ या घटनेची माहिती संबधित महिलेने दिली. रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदविण्याचे काम सुरु होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुभांभी शिरीष बावधनकर (वय ३८, रा. बार्शी) या आपले वडिल आजारी असल्याने त्यांना पाहण्यासाठी मोहोळला निघाल्या होत्या. घरातून लवकर बाहेर पडल्यानंतर साडेदहाच्या सुमारास त्या बसस्थानकावर आल्या. पती शिरीष बावधनकर यांचे चारचाकी मोटार बॅटरी दुरुस्तीचे गॅरेज असल्याने दुपारी घरी कोणीच नसणार म्हणून शुभांगी यांनी घरातील २२ तोळे सोने सोबत घेतले व वडिलांकडे निघाल्या.

बसस्थानकावर सकाळी ११.३० वाजता बार्शी-मोहोळ या एस.टी. गाडीत त्या बसल्या. एस.टी. गाडी बाळेश्वर नाका येथे आल्यानंतर त्यांनी पर्स तपासली तेव्हा पर्समध्ये असलेले लाखो रुपये कमतीचे २२ तोळे सोने व रोख रक्कम गायब असल्याचे बावधनकर यांच्या लक्षात आले. एस.टी. वाहकाला गाडी थांबविण्याची विनंती त्यांनी केली, शिवाय गाडीत सर्वांकडे चौकशी करण्याची विनंती त्यांनी वाहकाला केली, बस मध्ये चौकशी करून, घाबरलेल्या अवस्थेत त्या बसस्थानकावर आल्या, परंतु काहीच सुगावा लागला नाही. बसस्थानकात गाडीत चढत असतानाच अज्ञात चोरट्यांनी सोने लंपास केले असल्याचा संशय आहे. घडला प्रकार पती व आपल्या नातेवाईकांना त्यांनी सांगितला. अत्यंत कष्टातून जमा केलेले सोने एका झटक्यात लंपास झाल्याने शुभांगी बावधनकर यांना मोठा धक्का बसला आहे. यानंतर शहर पोलिसांत  जाऊन या घटनेची माहिती देण्यात आली. घटना सकाळी घडूनही केवळ चौकशी करून वेळ मारून नेणाऱ्या पोलिसांनी दिवसभर फिर्याद घेतली नाही. रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदविण्याचे काम बार्शी शहर पोलिस ठाण्यात सुरु होते. 

कष्टाचा एक एक रुपया गोळा सोन घेतलेल असत आयुष्य भराची पुंजी एक झटक्यात गेल्याने सामान्य जनता आर्थिक दृष्ट्या उध्वस्त होते. चोरीच्या घटनांचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून चोरट्याना जेरबंद करून सोन परत मिळवून दिला पाहिजे. 

चोरीच्या घटनांन मध्ये वाढ
मागील एक महिन्यात बार्शी तालुक्यात चोरीच्या घटनांन मध्ये वाढ झाली आहे. यात तीन वेळा पोलीस अधिकार्यांच्याच घरी चोरी अली आहे. यातील दोन घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे तर उपळाई रोड येथे राहत असलेल्या व सोलापूर मध्ये उपविभागीय पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने घरी चोरीचा प्रयत्न झाला तरी मुद्देमाल न गेल्याने व पोलिसांची अब्रू वाचवण्यासाठी फिर्याद दाखल केली नव्हती.

Web Title: 22 tola gold theft on barshi bus stand