दळणासाठी जावे लागते २५ किलोमीटर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

खेड - सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोरे एक महिना अंधारात असून, या खोऱ्यातील २१ गावांतील ग्रामस्थ चाचपडत जगत आहेत. ही २१ गावे कायमच दुर्लक्षित आहेत. १ जूनपासून विजेचा लपंडाव सुरूच आहे. मार्चमधे विजेची समस्या सुरू झाली होती. परंतु, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच विद्युत तारा तुटल्याने जून महिन्यापासूनच विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अद्यापही अंधारात आम्ही जीवन कंठत आहोत, अशी माहिती शिंदी येथील सदानंद मोरे यांनी दिली. 

रघुवीर घाट कांदाटी खोऱ्याला जोडला असल्यामुळे किमान आम्हाला आमची व्यथा तरी तुमच्यापर्यंत मांडता येते. दळणासाठी येथील लोकांना पंचवीस किलोमीटरवरील खेड तालुक्‍यातील खोपी -शिरगावला जावे लागते.नळाला पाणी येत नाही. विहिरींना अमाप पाणी आहे. प्रत्येक गावांमध्ये तीस ते पन्नासच्या आसपास घरे आहेत.अनेक जण असल्याने नोकरी धंद्यानिमित्त बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे म्हातारपणात पाण्यासाठी वणवण करावी लागते. वीज खंडीत झाल्याची तक्रार देण्यासाठी शंभर सव्वाशे किलोमीटरवर तापोळा किंवा मेढे येथे जावे लागते. प्रत्येक दिवशी एका नव्या समस्येला तोंड द्यावे लागते,असे हाताशपणे श्री.मोरे यांनी सांगितले. 

कार्यक्षेत्रात गावे येतात हे माहीत नाही  
यासंदर्भात महाबळेश्‍वर - वाई येथील कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण यानी सांगितले की, माझ्या कार्यक्षेत्रात ही गावे येतात हे मला देखील माहीत नाही. मी आठच दिवसापूर्वी चार्ज घेतला आहे. त्यामुळे तुम्ही आमचे सहाय्यक अभिंयता श्री. चोरमले यांच्याशी चर्चा करा. 

कांदाटी खोऱ्यातील दुर्लक्षित गावे 
शिंदी, वळवण, चकदेव, आरव, पर्बत, मोरणी, म्हाळुंगे, उचाट, साळोशी,  खांदाट, बन,  वाघावळे, लामज, निवळी, आकल्पे, रवदी, कूसापुर, आडोशी, माडोशी, पिपंरी, दरप.

Web Title: 25 kilometers to go to flour