ST Strike : 24 तासांत हजर न झाल्यास सेवासमाप्ती; 268 जणांना नोटिसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST

हे कर्मचारी कामावर हजर होणार काय? याकडे लक्ष लागले आहे.

24 तासांत हजर न झाल्यास सेवासमाप्ती; 268 जणांना नोटिसा

सांगली : एसटीच्या संपात सहभागी झालेल्या तात्पुरत्या वेतनश्रेणीवरील २६८ कर्मचाऱ्यांना २४ तासांत कामावर रुजू होण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. अन्यथा त्यांची सेवासमाप्ती केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हे कर्मचारी कामावर हजर होणार काय? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, काल सुरू झालेल्या शहरी बससेवेच्या फेऱ्या आज बंद पडल्या. शिवशाहीच्या खासगी चार गाड्या मात्र सुरू आहेत. पुरेशी खासगी वाहने नसल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबरपासून राज्यातील विविध आगारांत कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला आहे. या संपाला अनेक आगारांतून पाठिंबा मिळत गेला. त्यानंतर ८ नोव्हेंबरपासून एसटी कर्मचारी संघटना कृती समितीही यात उतरली. त्यामुळे संपूर्ण सेवा ठप्प झाली आहे. संपात सहभागी झाल्याबद्दल कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सांगली विभागात आतापर्यंत १७९ जणांना निलंबित करण्यात आले आहे. संपाचा प्रवासी सेवेवर परिणाम होऊ नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार खासगी प्रवासी वाहनांना अधिकृतपणे प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली. परंतु, अद्यापही काही मार्गांवर प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संप मिटण्याची प्रतीक्षा लागून राहिली.

हेही वाचा: राज्यात 3 दिवस रेन अलर्ट! कुठे मुसळधार, कुठे हलका पाऊस?

दरम्यान, शहरी बससेवेच्या तीन गाड्या दोन दिवसांपूर्वी सुरू केल्या होत्या. चालक-वाहकाअभावी ती पुन्हा बंद झाली आहे; तर शिवशाहीच्या चार गाड्या सुरू आहेत. आज संपात सहभागी झालेल्या तात्पुरत्या वेतनश्रेणीवरील २६८ कर्मचाऱ्यांना २४ तासांत कामावर हजर राहण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मुदतीत कामावर हजर न झाल्यास त्यांची सेवासमाप्ती केली जाईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे या नोटिसांबाबत या कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. बुधवारी (१७) नोटिसा बजावलेल्या कर्मचाऱ्यांपैकी किती कर्मचारी कामावर हजर होणार, याची उत्सुकता लागली आहे.

जादा भाडे घेतल्याच्या तक्रारी

प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी गाड्यांना प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. परंतु, बऱ्याच ठिकाणी आगाराबाहेर प्रवासी वाहतूक करताना मनमानी भाडे घेतले जाते. परंतु, पर्यायच नसल्याने प्रवाशांना भुर्दंड बसत आहे.

हेही वाचा: आघाडीच्या माजी मंत्र्याला राष्ट्रवादीच्या बंडखोरांचे आव्हान

loading image
go to top