सांगली शहरातील सीसीटिव्हीव्दारे 27 गुन्हे उघडकीस : मनीषा दुबुले

 27 crimes revealed by CCTV in Sangli city
27 crimes revealed by CCTV in Sangli city

सांगली : शहरातील गुन्हेगारीला आळा बसाविण्यासाठी शहरात बसविण्यात आलेल्या 82 सीसीटिव्ही कॅमेराच्या माध्यमातून आतापर्यंत 27 गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्ह्यातील 29 आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांनी यश मिळविले आहे. रविवारी (ता. 26) पासून शहरात नवीन 57 कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधिक्षक मनिषा दुबुले यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

त्या म्हणाल्या,""जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शहरात 82 सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले होते. प्रामुख्याने गुन्हे उघडकीस येण्यासाठी त्याची मदत झाली. आतापर्यंत 27 गुन्हे उघडकीस आलेले आहे. 29 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 25 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 43 हजार 490 वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून एक कोटी 9 लाख 17 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरात अजून सीसीटिव्हीची आवश्‍यकता होती. महापालिकेच्या माध्यमातून 50 लाख रुपयांचा निधी याकरिता मंजूर झाल्याने नवीन 57 कॅमेरे शहरातील अन्यत्र बसविण्यात आलेत. त्यात्त आठ कॅमेरे हे एएनपीआर (ऍटोमेटिक नंबर प्लेट रेकगनशन) पध्दतीचे आहेत. कॅमेऱ्यासमोरुन वाहन गेल्यावर त्या वाहनांचा नंबरप्लेटचा फोटो काढण्यात येणार आहे. त्याची माहिती कंट्रोल रुममध्ये संकलीत करण्यात येणार आहे.

शहरातील विश्रामबाग चौक, पुष्पराज चौक, कॉलेज कॉर्नर या ठिकाणी पब्लीक अनाऊंसमेंट सिस्टीम बसविण्यात आली आहे. कंट्रोल रुममधून चौकातील नागरिकांना सूचना देण्याची सुविधा असणार आहे.'' 

त्या म्हणाल्या,""26 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आयोजन करण्यात आले आहे. पोलिस अधिक्षक कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com