सांगली पालिकेत २७ पदवीधर; ३२ ‘नॉन मॅट्रिक’ नगरसेवक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

सांगली - सांगली, मिरज, कुपवाड  महापालिकेच्या नव्या ७८ कारभाऱ्यांपैकी २७ नगरसेवक पदवीधर आहेत. त्यात तब्बल १८ महिलांचा समावेश आहे. पदवीधरांपेक्षा मोठा आकडा ‘नॉन मॅट्रिक’ उमेदवारांचा असून, असे ३२ लोक कारभार पाहणार आहेत.

सांगली - सांगली, मिरज, कुपवाड  महापालिकेच्या नव्या ७८ कारभाऱ्यांपैकी २७ नगरसेवक पदवीधर आहेत. त्यात तब्बल १८ महिलांचा समावेश आहे. पदवीधरांपेक्षा मोठा आकडा ‘नॉन मॅट्रिक’ उमेदवारांचा असून, असे ३२ लोक कारभार पाहणार आहेत. दहावी उत्तीर्णांची संख्या नऊ, बारावी शिकलेल्यांची संख्या दहा आहे. या साऱ्यांत ‘शाळाबाह्य’ म्हणजे कधीही शाळेत न गेलेले दोन  उमेदवार आहेत.

निवडणूक विभागाने रिंगणातील उमेदवारांच्या कुंडल्या लोकांसमोर मांडल्या होत्या. त्यात उमेदवारांनी भरलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी समोर आली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आजच ‘आधी आम्ही नगरसेवकांना ट्रेनिंग देऊ’ अशी घोषणा केली आहे. ती अत्यंत महत्त्वाची आहे, मात्र सर्वपक्षीयांना प्रशिक्षण  देणार का, याबद्दल खुलासा झालेला नाही.

पदवीधरांत कुणाचे किती 
भाजप -१४, काँग्रेस - ७, राष्ट्रवादी - ५, स्वाभिमानी आघाडी - १

 त्या पार्श्‍वभूमीवर अभ्यासू, शिक्षित नगरसेवकांचा आलेख पाहिला तर संमिश्र स्थिती समोर येते. दोन किंवा त्याहून  अधिकवेळा विजयी झालेल्या नगरसेवकांची संख्या २९ इतकी आहे. म्हणजे तब्बल ४९ उमेदवार हे पहिल्यांदाच महापालिकेत प्रवेश करणार आहेत. 

पदवीधर नगरसेवक असे -
उर्मिला बेलवलकर, भारती दिगडे, ॲड. स्वाती शिंदे, रोहिणी पाटील, संतोष पाटील, वर्षा निंबाळकर,  अनारकली कुरणे, शुभांगी साळुंखे, गीतांजली ढेपे  पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, महेंद्र सावंत, शेडजी मोहिते, पद्मश्री पाटील, विजय घाडगे, वहिदा नायकवडी, सोनाली सागरे, कल्पना कोळेकर, नर्गिस सय्यद, सवीता मदने, संजय कुलकर्णी, योगेंद्र थोरात, संगीता हारगे, अनिता वनखंडे, अस्मिता सरगर, मोहना ठाणेदार,  निरंजन आवटी, करण जामदार. 

Web Title: 27 graduate and 32 non metric Corporators in Sangli corporation