कोल्हापूर जिल्ह्यातील २७ पोलिसांना महासंचालक पदक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

एक नजर

  • पोलिस दलात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्यासह जिल्ह्यातील २७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर.
  • महाराष्ट्र दिनी १ मे रोजी पोलिस मुख्यालयात होणाऱ्या संचलन कार्यक्रमामध्ये वितरण.
  • राज्यातील ८०० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर

कोल्हापूर - पोलिस दलात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्यासह जिल्ह्यातील २७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक आज जाहीर झाले. महाराष्ट्र दिनी १ मे रोजी पोलिस मुख्यालयात होणाऱ्या संचलन कार्यक्रमावेळी ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

गंभीर गुन्ह्याचा छडा लावणे, गुन्हेगारांना जेरबंद करणे, १५ वर्षे सतत उल्लेखनीय कार्य केलेल्या राज्यातील ८०० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले. यात जिल्ह्यातील २७ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांना सलग १५ वर्षे उत्तम सेवाभिलेख केल्याबद्दल पदक जाहीर झाले.

तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार श्रीकांत मोहिते यांनी काळबा गायकवाडला जीवाची पर्वा न करता जेरबंद करण्यात मोलाचे कार्य केले. त्यात ते जखमीही झाले होते. इचलकरंजी वाहतूक शाखेतील पोलिस हवालदार अनिल ढवळे यांनी इचलकंरजी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरीसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत २६ वर्षांच्या सेवेत पेट्रोल पंपावरील भेसळ, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले.

पदक जाहीर झालेल्या अन्य पोलिसांची नावे अशी - 

सहायक पोलिस निरीक्षक मोहन पाटील, सहायक फौजदार सुरेश जाधव (नागरी हक्क संरक्षण), मनोहर कोळी, सुनील पोटे, विष्णू कांबळे (बिनतारी संदेश), पोलिस हवालदार नंदकुमार माने (नागरी हक्क संरक्षण), प्रशांत पाटील, अनिल पाटील, यमीर शेख (नागरी हक्क संरक्षण), झाकीर इनामदार (दहशतवादविरोधी पथक), विठ्ठल जरग, किरण कागलकर, रवींद्र बंडू गायकवाड, संभाजी भोसले, हणमंत ऊर्फ अनिल ढवळे, वैभव दड्डीकर, आप्पासाहेब पालखे, विलास किरोळकर (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा), उमर नूरमहंमद, राजेश राठोड, पोलिस नाईक आयूबखान मुल्ला, पांडुरंग पाटील, किरण भोगम, भीमगोंडा पाटील, सचिन खंडागळे.

Web Title: 27 police officers from Kolhapur district awarded