esakal | जिल्ह्यात नवे 293 रूग्ण : 18 जणांचा मृत्यू...महापालिका क्षेत्रात 125 रूग्ण : वाळवा तालुक्‍यात 60 बाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

CORONA.jpg

सांगली-  जिल्ह्यात आज दिवसभरात नवीन 293 कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यापैकी 125 रूग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. तर ग्रामीण भागात वाळवा तालुक्‍यात 60 रूग्ण आढळले. जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित रूग्णसंख्या 8970 इतकी झाली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील 15 आणि परजिल्ह्यातील तीन अशा 18 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर दिवसभरात 238 रूग्ण कोरोनामुक्त झाले. 

जिल्ह्यात नवे 293 रूग्ण : 18 जणांचा मृत्यू...महापालिका क्षेत्रात 125 रूग्ण : वाळवा तालुक्‍यात 60 बाधित 

sakal_logo
By
घनश्‍याम नवाथे

सांगली-  जिल्ह्यात आज दिवसभरात नवीन 293 कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यापैकी 125 रूग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. तर ग्रामीण भागात वाळवा तालुक्‍यात 60 रूग्ण आढळले. जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित रूग्णसंख्या 8970 इतकी झाली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील 15 आणि परजिल्ह्यातील तीन अशा 18 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर दिवसभरात 238 रूग्ण कोरोनामुक्त झाले. 

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात कोरोना बाधित रूग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. 25 दिवसात साडे पाच हजारहून अधिक रूग्ण वाढले. त्याच प्रमाणात जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात 293 नवे रूग्ण आढळले. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील 125 रूग्ण आहेत. पैकी 90 रूग्ण सांगलीतील आणि 35 मिरजेतील आहेत. तर ग्रामीण भागात आटपाडी तालुक्‍यात 11, जत तालुका 6, कडेगाव 2, कवठेमहांकाळ 8, खानापूर 24, मिरज 34, पलूस 1, शिराळा 14, तासगाव 8, वाळवा 60 याप्रमाणे रूग्ण आढळले. आज दिवसभरात आरटीपीसीआर तपासणीत 151 तर ऍन्टीजेन चाचणीत 150 रूग्ण आढळले. दोन्ही चाचणीत जिल्ह्यातील 293 तर परजिल्ह्यातील 8 रूग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. 

आज दिवसभरात सांगलीतील चार पुरूष व महिला, ढवळीतील पुरूष, मिरजेतील तीन महिला व पुरूष, कुपवाडमधील दोन महिला, काळमवाडी (ता.वाळवा) येथील वृद्ध, गोटखिंडी (ता. वाळवा) येथील वृद्ध, नागेवाडी (ता. खानापूर) येथील महिला अशा जिल्ह्यातील 15 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच जयसिंगपूर येथील एक आणि शिरोळमधील दोघे अशा परजिल्ह्यातील तिघांचाही येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आजअखेर जिल्ह्यातील 360 जणांचा तर परजिल्ह्यातील 90 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 
सद्यस्थितीत जिल्ह्यात 3058 रूग्ण उपचार घेत असून त्यापैकी 485 जण चिंताजनक आहेत. त्यांना ऑक्‍सिजन आणि व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर दिलासादायक म्हणजे आज 238 जण कोरानामुक्त झाले आहेत. 
 

जिल्ह्यातील चित्र- 

  • आजअखेरचे पॉझिटीव्ह रूग्ण- 8970 
  • सद्यस्थितीत उपचार घेणारे रूग्ण- 3058 
  • आजअखेर बरे झालेले रूग्ण- 5552 
  • जिल्ह्यातील मृत झालेले रूग्ण-360 
  • परजिल्ह्यातील मृत झालेले रूग्ण-90 
  • पॉझिटीव्हपैकी चिंताजनक रूग्ण-485 
  • आजअखेर ग्रामीण रूग्ण-3001 
  • आजअखेर शहरी रूग्ण-747 
  • महापालिका क्षेत्र रूग्ण-5222 
loading image
go to top