अहमदनगर-टेंभुर्णी रस्त्यावरील अपघातात तिघांचा मृत्यू

अण्णा काळे
बुधवार, 20 जून 2018

करमाळा (सोलापूर) : अहमदनगर-टेंभुर्णी रस्त्यावर कुंभेज फाटा (ता.करमाळा) येथे झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज (ता.20) पहाटे चारच्या सुमारास घडला असून मृत्यू पावलेले तिघेही जळगाव जिल्ह्यातील आहेत. बोलेरो गाडी(एम.एच.19,बीयु 9856) 50 फुट खोल कॅनाॅलमध्ये पडुन हा अपघात झाला आहे. 

फारूक रजमान शेख (वय 62), फरहाण खान (वय 23, दोघेही रा. इस्लामपुर,ता.जामनेर,जि.जळगांव), तहेरीम हरीश जफर महमंद शेख (वय 22, कोर्ट मोहल्ला,ता.जामनेर,जि.जळगांव) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. हे तीघेही जामनेरवरून गोवा येथे चालले होते. कुंभेज फाटा (ता.करमाळा) येथे पावसाच्या पाण्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटुन गाडी थेट कॅनाॅलमध्ये गेली. तीनही मृतदेह करमाळा पोलिसांनी तात्काळ बाहेर काढले आहेत. पुढील तपास केदार भरमशेट्टी करत आहेत. 
 
Web Title: 3 dies in accident on ahamadnagar tembhurni road