कऱ्हाडमधून तीन शालेय मुली बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

कऱ्हाड : येथील एका प्रथितयश शाळेतील दहावीत शिकणाऱ्या तीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. काल (ता.16) सकाळपासून त्या कोणासही काहीही न सांगता निघून गेल्या. शोधूनही न सापडल्याने त्यांच्या नातेवाईकांनी काल पोलिसात माहिती दिली आहे.

पोलिसांनी काल रात्रीपासून तपासाची सुत्रे हलवली आहेत. मात्र फारशी माहिती हाती लागलेली नाही. शहरात राहणाऱ्या तिन्ही मुली मध्यवर्ती एका प्रतिथयश शाळेत दहावीत शिकतात. घरी शाळेत जातो असे सांगून त्या घरातून निघून गेल्या आहेत. घरी न परतल्याने व त्यांचा शोधूनही पत्ता न लागल्याने पोलिसात माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या तपास पहाटे तीन पर्यंत सुरू होता. मात्र अपेक्षित माहिती पोलिसांच्याही हाती आली नव्हती.

Web Title: 3 school students missing from karhad