शिक्षक बदलीसाठी पहिल्याच  दिवशी 3 हजार अर्ज 

 मिलिंद देसाई
Thursday, 19 November 2020

वेळापत्रक जाहीर होताच  शिक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच बदलीसाठी अर्ज करण्यात सुरवात केली

बेळगाव : शिक्षण खात्याने बदली प्रक्रियेला चालना देताच मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले जात असून शिक्षक मित्र ऍपच्या माध्यमातून  पहिल्याच दिवशी 3000 हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 

रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून वेळापत्रक जाहीर होताच  शिक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच बदलीसाठी अर्ज करण्यात सुरवात केली असून शिक्षकांना 30 तारखेपर्यंत अर्ज दाखल झाले आहेत  16  व 17 डिसेंबर रोजी प्राथमिक तर 18 ते 19 रोजी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदलीसाठी कौंशीलिंग होणार आहे. यासाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासह राज्यातून 1 लाखाहून अधिक अर्ज दाखल होतील अशी अपेक्षा शिक्षण खात्यातून व्यक्त होत आहे. 

हेही वाचा- किती आले किती गेले, मुंबईकरांचे प्रेम मात्र शिवसेनेवरच 

दरवेळी बदली प्रक्रियेवेळी तांत्रिक अडचण निर्माण होते त्यामुळे प्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ शिक्षण खात्यावर येते मात्र यावेळी प्रक्रिया सुरळीतरित्या पार पडावी यासाठी शिक्षण नवे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यामुळे कौंशिलिंग वेळेत पार पडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

गेल्या वर्षी सक्तीची बदली करण्यात आलेल्या शिक्षकांनाही यावेळी बदलीसाठी अर्ज करता येणार आहेत त्यामुळे यावेळी अर्जांची संख्या वाढणार आहे तसेच 3 वर्षे पूर्ण झालेले व परस्पर बदलीसाठीही अधिक संख्येने अर्ज दाखल होण्याची 
शक्यता आहे. 

शिक्षक मित्र ऍपमुळे शिक्षकांना अर्ज करणे सुलभ झाले आहे बदली प्रक्रियेत यावेळी अधिक संख्येने शिक्षक भाग घेतील असे वाटते 
अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

 

संपादन- अर्चना बनगे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 thousand form first day application teacher transfer