कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप ३० कुष्ठरोगी..

कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप ३० कुष्ठरोगी..

कोल्हापूर - कुष्ठरोगाचे प्रमाण घटले, असे म्हटले जात असले तरीही राज्यात झालेल्या सर्वेक्षणात पाच हजार २६८ नवीन कुष्ठरोगी आढळले आहेत. २४ सप्टेंबर ते ९ ऑक्‍टोबर या कालावधीत आरोग्य विभागाने राज्यातील ३५ जिल्ह्यांत सर्वेक्षण केले. 

सर्वेक्षणात दोन लाख ७६ हजार ७०७ संशयित रुग्ण मिळाले होते. त्यापैकी दोन लाख ६५ हजार ६४७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात प्रत्यक्षात पाच हजार २६८ जणांना कुष्ठरोग झाला असल्याचे स्पष्ट झाले. 

राज्यातील सर्वेक्षणात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २३६, भंडारा १६८, अमरावती १९१, नाशिक १९१ असे रुग्ण आढळले. त्या तुलनेत कोल्हापूर ३०, पुणे ८८, सातारा ५०, सोलापूर ६३, सांगली ४१, रत्नागिरी ८ व सिंधुदुर्गात २० रुग्ण आढळले.
यापूर्वी आदिवासी, मागास क्षेत्रातील परिसरातच कुष्ठरोगी शोध मोहिमेवर भर होता. पण, सप्टेंबर ते ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत राज्यात सर्वत्र एकावेळी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. एका पथकात दोन कर्मचारी अशा पद्धतीने ४२ हजार पथकांनी सर्वेक्षण केले. 

या पथकात महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. विशेषतः ग्रामीण भागात या सर्वेक्षणाला अधिक प्रतिसाद मिळाला. आशा व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गावागावांतील संपर्कामुळे सर्वेक्षण करणे सोपे गेले. शरीरावर दिसणारा चट्टा हे मुख्य लक्षण समजून नोंदी घेण्यात आल्या. नंतर या चहाची तपासणी 
करण्यात आली. 

कुष्ठरोगासाठी सर्वेक्षण हे आव्हानात्मक काम होते; पण सर्वांनी मिळून सर्वेक्षण पूर्ण केले. त्यात पाच हजार ६०० रुग्ण आढळले. सर्वेक्षण झाले नसते तर हे रुग्ण उपचारांशिवाय वावरत राहिले असते. त्यांचा आजार बळावला असता. उपचार कठीण झाला असता. त्यांच्याकडून होणारा संसर्गही सुरू राहिला असता. त्यामुळे आता आम्ही ज्यांना कुष्ठरोग झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना प्रतिबंधात्मक लसही दिली. 
- डॉ. आर. एस. आडकेकर,
आरोग्य सहसंचालक, कुष्ठरोग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com