

State transport buses carrying election staff
sakal
नवेखेड : गेली आठ दिवस सुरू असलेला प्रचाराचा धुरळा काल बसला आणि प्रत्यक्षात मतदानाची वेळ काही तासांवर आली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. आजपासून जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर तब्बल २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.