पाणीपुरवठा योजनांसाठी 360 कोटी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

सातारा - जिल्ह्यातील टंचाईग्रस्त असणाऱ्या गावांना पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिलासा दिला. चालू आर्थिक वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोन योजनांमधून ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी तब्बल 360 कोटी रुपये मंजूर झाले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या योजनांना चालना मिळेल. 

सातारा - जिल्ह्यातील टंचाईग्रस्त असणाऱ्या गावांना पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिलासा दिला. चालू आर्थिक वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोन योजनांमधून ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी तब्बल 360 कोटी रुपये मंजूर झाले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या योजनांना चालना मिळेल. 

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून 581 गावांसाठी 568 पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला मार्च 2015 मध्ये केंद्र शासनाने स्थगिती दिली होती. मागील दोन वर्षांत केवळ संसद आदर्श ग्राममध्येच योजना घेण्याचे केंद्र सरकारचे निर्देश होते. त्यामुळे मागील दोन वर्षांमध्ये खूप कमी योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. ही स्थगिती उठविण्यासाठी मंत्री लोणीकर यांनी सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा करत केंद्रीय मंत्री उमा भारतींकडे मागणी केली होती. केंद्र शासनाने 2018-19 मध्ये राज्यातील पाणीपुरवठा योजना घेण्यासाठी परवानगी दिली. 

या आराखड्यामध्ये प्रामुख्याने सहपालकमंत्री सदाशिव खोत यांनी सुचविलेल्या सर्व योजना व जिल्ह्यातील आमदार, पंचायत समिती सदस्य व सरपंचांनी मागणी केलेल्या योजनांचा समावेश आहे. या सर्व योजनांना समाविष्ट करून या वर्षी जिल्ह्यातील 581 वाड्यावस्त्यांसाठी 568 योजनांचा समावेशक असा आराखडा तयार केला आहे. या योजना राबविण्यासाठी एकूण 222 कोटी 12 लाख रुपये एवढा अंदाजपत्रकीय खर्च लागणार आहे. या आराखड्यात मागील चालू असलेल्या योजनांसाठी 63 कोटी 28 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन व चालू असणाऱ्या अशा 600 गावे, वाड्यांतील 582 योजनांसाठी 285 कोटी 40 लाखांचा आराखडा अंतिमत: मान्य करण्यात आला आहे. 

योजनानिहाय मंजूर निधीची रक्कम 
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना : 581 गावांतील 568 योजनांसाठी 222 कोटी 12 लाख 
मुख्यमंत्री पेयजल योजना : 45 गावांतील 34 योजनांसाठी 19 कोटी 20 लाख 
जलस्वराज्य टप्पा दोन योजना : निमशहरी आठ गावांच्या आठ योजनांसाठी 55 कोटी 27 लाख 
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) : शौचालय बांधकामासाठी 7 कोटी 35 लाख 

तालुकानिहाय मंजूर योजना... 
तालुका........योजनेची संख्या..........निधी कोटीत 
जावळी............. 26..............7.77 
कऱ्हाड..............112.............59.43 
खंडाळा..............14..............5.51 
खटाव..............59..............32.94 
कोरेगाव.............74..............31.27 
महाबळेश्वर............15..............4.26 
माण..................16..............8.08 
पाटण..............118..............23.58 
फलटण..............47..............17.40 
सातारा..............45..............18.84 
वाई...................42..............13.00 

Web Title: 360 crore for water supply schemes National Rural Drinking Water Scheme