सहकार विभागाकडून 38 संस्थांना पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

वर्धा कुक्कुटपालन व कृषी उद्योग संशोधन संस्थेला एक लाखांचा पुरस्कार

वर्धा कुक्कुटपालन व कृषी उद्योग संशोधन संस्थेला एक लाखांचा पुरस्कार
सोलापूर - सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाकडून "सहकार महर्षी', "सहकार भूषण' व "सहकार निष्ठ' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील 38 संस्थांची निवड करण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील उत्कृष्ट सहकारी संस्थांची निवड करण्यासाठी सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या पुरस्कारांसाठी राज्यभरातून 133 प्रस्ताव आले होते. यातून 38 संस्थांची निवड करण्यात आली आहे. 26 एप्रिल रोजी सोलापुरात या संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.

पुरस्काराचे नाव व पुरस्कारप्राप्त संस्था पुढीलप्रमाणे : सहकार महर्षी राज्यस्तरीय पुरस्कार : वर्धा कुक्कुटपालन व कृषी उद्योग संशोधन सह. संस्था जि. वर्धा, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था : सहकार भूषण पुरस्कार : वसंत सर्व सेवा सहकारी सोसायटी लि. म्हैसाळ, (ता. मिरज, जि. सांगली), निफाड विविध कार्यकारी (विकास) सेवा सहकारी सोसायटी लि. निफाड (नाशिक), नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. नेरपिंगळाई (ता. मोर्शी, जि. अमरावती), सहकार निष्ठ पुरस्कार : अंधारी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था. मर्या. सिल्लोड (जि. औरंगाबाद), लांजे पंचक्रोशी वि. का. सेवा सोसायटी लि. (ता. लांजा, जि. रत्नागिरी), विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्या. तळोधी, (ता. नागभीड, जि. चंद्रपूर).

नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था व पगारदार नोकरांच्या पतसंस्था : सहकारभूषण पुरस्कार : ज्ञानदीप सहकारी पतसंस्था म. अरुणोदय नगर मुलुंड (पू), मुंबई, धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. (जि. सातारा), भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था मर्या. (जि. उस्मानाबाद), सहकार निष्ठ पुरस्कार : साईसेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था म. काष्टी (ता. श्रीगोंदा, जि. नगर), प्रियदर्शनी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. (ता. नांदुरा, जि. बुलडाणा), गिरनार अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. (नागपूर).

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक : सहकार भूषण पुरस्कार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मर्या. (पुणे), सहकार निष्ठ पुरस्कार : लातूर जिल्हा मध्यवर्ती सह. बॅंक मर्या. (लातूर), रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि. (रत्नागिरी). नागरी सहकारी बॅंका : सहकार भूषण पुरस्कार : म्युनिसिपल को- ऑप. बॅंक लि. फोर्ट, मुंबई, विदर्भ मर्चंट को-ऑप. बॅंक. मर्या. हिंगणघाट (ता. हिंगणघाट, जि. वर्धा), सहकार निष्ठ : अभिनंदन अर्बन को-ऑप. बॅंक मर्या. अमरावती, दि बाबासाहेब देशमुख सहकारी बॅंक मर्या. आटपाडी (सांगली). सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरणी, सहकारी दूध संघ : सहकार भूषण पुरस्कार : श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि., श्रीपूर (ता. माळशिरस, जि. सोलापूर), कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ), हुतात्मा स्वामी वारके सहकारी सूतगिरणी मर्या. मुदाळ (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), सहकार निष्ठ पुरस्कार : रेणा सहकारी साखर कारखाना लि. दिलीप नगर निवाडा (जि. लातूर), विकास सहकारी साखर कारखाना लि. (लातूर), संगमनेर तालुका दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्या. संगमनेर (जि. नगर).

गृहनिर्माण सहकारी संस्था : सहकार भूषण : मॅराथॉन कॉसमॉस को-ऑप. हाउसिंग सोसायटी लि. (मुंबई), दि योगानंद को-ऑप. हाउसिंग सोसायटी, बोरिवली (प.), मुंबई, सहकार निष्ठ : महावीर नगर को-ऑप. हाउसिंग सोसायटी मर्या. डोंबिवली (पू.), स्वप्नपूर्ती फेज -1 सहकारी गृहरचना संस्था मर्या. (ता. हवेली, जि. पुणे), सकारी कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. (भंडारा). औद्योगिक संस्था, हातमाग व यंत्रमाग संस्था, उपसा सिंचन संस्था व इतर संस्था : सहकार भूषण पुरस्कार : महाबळेश्‍वर मध उत्पादक सहकारी सोसायटी मर्या. (महाबळेश्‍वर, जि. सातारा), महामुंबई छत्री उत्पादक केंद्र लि. कांजूरमार्ग (पू), मुंबई. फळे, भाजीपाला संस्था, खरेदी- विक्री संघ, प्रक्रिया संस्था व ग्राहक संस्था : सहकार भूषण : दि कुलाबा सेंट्रल को-ऑप. कन्झ्युमर्स होलसेल अँड रिटेल स्टोअर्स लि. मुंबई, रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघ मर्या. कोल्हापूर. सहकार निष्ठ पुरस्कार : दि पांडव सह. विपणन आणि भातगिरणी मर्या. (जि. गोंदिया). प्राथमिक दूध उत्पादक संस्था, कुक्कुटपालन संस्था, मत्स्यपालन संस्था व पशुसंवर्धन संस्था : सहकार भूषण पुरस्कार : गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या. राजुरी (ता. जुन्नर, जि. पुणे), सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. (जि. पालघर).

Web Title: 38 organisation award by cooperation department