38 हजारावर विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - प्राथमिक शिक्षण स्तरावरील महत्त्वपूर्ण असलेली इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आज झाली. जिल्ह्यात 259 केंद्रावर.... विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या एकूण 38 हजार 575 विद्यार्थ्यांपैकी 38 हजार 155 विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी दिली. 

कोल्हापूर - प्राथमिक शिक्षण स्तरावरील महत्त्वपूर्ण असलेली इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आज झाली. जिल्ह्यात 259 केंद्रावर.... विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या एकूण 38 हजार 575 विद्यार्थ्यांपैकी 38 हजार 155 विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी दिली. 

प्रत्येक तालुक्‍यात विविध शाळांत परीक्षा केंद्रे होती. प्रत्येक केंद्रांवर केंद्रसंचालक व निरीक्षक यांची नेमणूक केली होती. पर्यवेक्षक म्हणून इयत्ता नववी ते बारावीसाठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी काम पाहिले. इयत्ता 5 वीच्या परीक्षेसाठी 1890 शाळांमध्ये 23 हजार 517, तर आठवीच्या परीक्षेसाठी 990 शाळांमधील 14 हजार 638 विद्यार्थी परीक्षेस बसले. परीक्षा नियोजनासाठी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका गटशिक्षणाधिकारी यांच्यातर्फे आजच परीक्षा केंद्रावर पोच केल्या. 

या वर्षी प्रथमच चौथी व सातवीऐवजी पाचवी व आठवी या इयत्तासाठी शिष्यवृत्ती परीक्षा झाली. तीनऐवजी दोन पेपर झाले. प्रत्येक पेपर हा दीडशे गुणांचा होता. विद्यार्थ्यांस त्याच्याच बैठक क्रमांकाची उत्तरपत्रिका देण्यात आली. मुधाळ (ता. भुदरगड), रुकडी (ता. हातकणंगले) येथील केंद्रांना शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी भेटी दिल्या. प्राथमिक शिक्षण संचालनालयातील शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनीही परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. 

तालुक्‍यातील विविध केंद्रांबरोबरच कोल्हापूर शहरातही 19 केंद्रांवरही परीक्षा झाली. शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री जाधव यांनी परीक्षाप्रमुख म्हणून काम पाहिले. उत्तरपत्रिका आजच मेन राजाराम हायस्कूल येथे जमा करणार आहेत. जिल्ह्यात परीक्षा सुरळीत पार पडली. 

प्रथमच एबीसीडी पद्धतीने प्रश्‍नपत्रिका 
विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या व न सोडविलेल्या प्रश्‍नांची संख्या उत्तरपत्रिकेवर परीक्षा संपल्यावर पर्यवेक्षकांनी लगेचच नोंदविली गेली. उत्तरपत्रिकेवर पर्यवेक्षकाचे नाव व दोन ठिकाणी स्वाक्षरी घेतली आहे. या परीक्षेसाठी प्रथमच ए.बी.सी.डी पद्धतीने प्रश्‍नपत्रिका देण्यात आल्या. 

Web Title: 38 thousand students the scholarship exam