शालेय पोषण आहारातील 39 हजार शाळा एलपीजीविना 

तात्या लांडगे
शुक्रवार, 25 मे 2018

सोलापूर : राज्यातील 38 हजार 598 शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत एलपीजी कनेक्‍शन नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत शासनाने माहिती मागविली असून जुलै 2018 पर्यंत सर्व शाळांना एलपीजी जोडण्याचे आदेश दिले आहेत. 

सोलापूर : राज्यातील 38 हजार 598 शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत एलपीजी कनेक्‍शन नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत शासनाने माहिती मागविली असून जुलै 2018 पर्यंत सर्व शाळांना एलपीजी जोडण्याचे आदेश दिले आहेत. 

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत राज्यातील 86 हजार 780 शाळा पात्र आहेत. त्यापैकी चंद्रपूरातील 2035 व मुंबईमधील 2389 आणि गडचिरोलीतील 1799 पैकी एकाही शाळांनी एलपीजी कनेक्‍शनच नाही. तर धुळे, नाशिक, सांगली, सातारा जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये एलपीजी कनेक्‍शन जोडणी करण्यात आलेली आहे. एलपीजी कनेक्‍शन नसलेल्या शाळांना जुलै महिन्यापर्यंत शंभर टक्‍के कनेक्‍शन घेण्याच्याही शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 

कनेक्‍शन नसलेले जिल्हानिहाय यादी 

सोलापूर : 4073 पैकी 2410, अहमदनगर : 4538 पैकी 3400, अकोला : 1430 पैकी 842, अमरावती : 2401 पैकी 989, औरंगाबाद : 2981 पैकी 712, बीड : 3224 पैकी 26, बुलढाणा : 2013 पैकी 84, भंडारा : 1132 पैकी 397, गोंदिया : 1374 पैकी 35, हिंगोली : 1032 पैकी 20, जळगाव : 2748 पैकी 212, जालना : 1923 पैकी 101, कोल्हापूर : 3061 पैकी 2408, लातूर : 2137 पैकी 116, नागपूर : 2849 पैकी 1023, नांदेड : 3021 पैकी 36, नंदूरबार : 1705 पैकी 354, उस्मानाबाद : 1548 पैकी 23, परभणी : 1583 पैकी 96.

पुणे : 5432 पैकी 5011, रायगड : 3208 पैकी 1047, रत्नागिरी : 3076 पैकी 1099, सिंधुदूर्ग : 1670 पैकी 922, ठाणे : 2785 पैकी 2350, पालघर : 2393 पैकी 1066, वर्धा : 1246 पैकी 67, वासिम : 1110 पैकी 231 आणि यवतमाळमधील 2782 पैकी 1493 शाळांमध्ये एलपीजी कनेक्‍शन नाहीत.

Web Title: 39 thousand schools are without LPG Connection