राज्यात फक्‍त 40 लाख उतारे डिजिटल 

तात्या लांडगे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

सोलापूर -  राज्यातील खातेदारांना घरबसल्या सात-बारा मिळावा, त्यांना तलाठ्यांकडे हेलपाटे मारायला लागू नयेत, या उद्देशाने डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा देण्याचे नियोजन सरकारने वर्षभरापूर्वी केले; परंतु आतापर्यंत राज्यातील फक्‍त 40 लाख सात-बारा उताऱ्यांवर डिजिटल स्वाक्षरीचे काम झाले आहे. त्यासाठी बनविलेले सॉप्टवेअर वारंवार बंद पडत असल्याने आता डिजिटल सात-बाराचे फिडिंग क्‍लाउड या सॉप्टवेअरवर सुरू झाले आहे. 

राज्यातील सर्व गावांमधील सात-बारा उताऱ्याच्या ऑनलाइन नोंदी पूर्ण झाल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे; परंतु गावपातळीवर अद्यापही नोंदीचा घोळ सुरुच आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका अचूक सात-बारा ऑनलाइन करणारा पहिला तालुका असल्याचा डांगोरा जिल्हा प्रशासनाने पिटला; परंतु त्या तालुक्‍यातील सावळेश्‍वर, मोरवंचीसह अन्य गावांमधील ऑनलाइन नोंदीमध्ये घोळ कायम आहे. शेतकरी दुरुस्तीसाठी वारंवार संबंधित मंडल अधिकारी व तलाठ्यांकडे हेलपाटे मारत आहेत. त्यामुळे ऑनलाइनपेक्षा हस्तलिखित उतारा बरा होता, अशा प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत. 

ठळक बाबी... 
- राज्यात 2.56 कोटी सात-बारा खातेदार 
- आतापर्यंत 16 टक्‍केच उताऱ्यांवर डिजिटल स्वाक्षऱ्या 
- राज्यातील 43 हजार गावांचे सात-बाराचे काम पूर्ण 
- आणखी दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार 

राज्यातील सात-बारा उताऱ्याचे ऑनलाइन दुरुस्ती व फिडिंगचे काम पूर्ण झाले आहे. खातेदारांना डिजिटल स्वाक्षरीच्या सात-बारासाठी आणखी किमान दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल. सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने क्‍लाउड या सॉप्टवेअरमध्ये उताऱ्यांचे फिडिंग सुरू आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर निविदेद्वारे एखाद्या कंपनीकडे त्याचा ठेका दिला जाईल. 
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

Web Title: 40 lakh extracts in the state are digital