पाटणजवळ वाहन तपासणीत 46 लाखांची रोकड जप्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

निसरे फाटा येथे दोन वाहनांमधून सुमारे 46 लाखांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. मंगळवारू रात्री उशिरा स्थानिक स्थिर पथकाने कारवाई केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वाहनांची तपासणी सुरू असताना कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.   

पाटण (जि. सातारा) : निसरे फाटा येथे दोन वाहनांमधून सुमारे 46 लाखांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा स्थानिक स्थिर पथकाने कारवाई केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वाहनांची तपासणी सुरू असताना कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.   

पोलिसांनी सामगतले की,  तालुक्यात लोकसभेच्या  पार्श्‍वभूमीवर कऱ्हाड ते  चिपळूण मार्गावर निसरे फाटा येथे  नाकाबंदी सुरू होती. त्यावेळी तपासणीत एका बँकेची 44 लाख 62 हजार 594 रक्‍कम वाहनातून घेऊन जात असताना सापडली. स्थिर पथकप्रमुख सी. टी. क्षीरसागर, सहायक एन. के. माळी व सी. ए. पाटील यांच्या पथकाने कारवाई केली. त्याची माहिती पोलिसांना दिली. त्या रकमेचा पंचनामा झाला आहे. तू  रक्कम बँकेच्या ताब्यात दिली आहे. दुसर्‍या कारमध्ये  (एम.एच. 11 बी.व्ही 3017) 92 हजारांची रोकड सापडली.  ती सुंदरलाल लांडगे (रा.पाचवड, ता.वाई) यांच्याकडे होती. रक्कम जप्त करण्यात आली आहे. स्थिर पथक प्रमुख सुखदेव खांडेकर, सहायक रांजेद्र काळे, ग्रामसेवक शिंदे यांच्या पथकाने कारवाई केली. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी भेट दिली आहे.

Web Title: 46 lakhs found in vehicle checking at Patan Satara