सिव्हील हॉस्पिटलमध्ये 47 "आयसीयु' बेड कार्यान्वित : पृथ्वीराज पाटील...वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचा निर्णय 

घनश्‍याम नवाथे
Tuesday, 11 August 2020

सांगली- येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये कोविड रूग्णांसाठी 47 "आयसीयु' बेड तातडीने कार्यान्वित केले आहेत. शासकीय रूग्णालयात गैरसोयीमुळे रूग्ण दगावले जावू नयेत यासाठी आयसीयु बेडची संख्या वाढवण्याची मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानुसार 47 आयसीयु बेड मंजूर असून त्याचा लाभ रूग्णांना होत असल्याची माहिती कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. 

सांगली- येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये कोविड रूग्णांसाठी 47 "आयसीयु' बेड तातडीने कार्यान्वित केले आहेत. शासकीय रूग्णालयात गैरसोयीमुळे रूग्ण दगावले जावू नयेत यासाठी आयसीयु बेडची संख्या वाढवण्याची मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानुसार 47 आयसीयु बेड मंजूर असून त्याचा लाभ रूग्णांना होत असल्याची माहिती कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. 

ते म्हणाले, ""जिल्ह्यात कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे. तसेच रूग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. बाहेरील जिल्ह्यातून उपचारासाठी दाखल रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. शासकीय रूग्णालयामध्ये "आयसीयु' बेडची संख्या कमी असल्याने गैरसोयीतून रूग्ण दगावतात. त्यामुळे 50 "आयसीयु' बेडची संख्या वाढवावी अशी मागणी मंत्री देशमुख यांच्याकडे केली. त्यानुसार त्यांनी सिव्हीलमध्ये 47 "आयसीयु' बेड मंजूर केले. त्यापैकी 18 बेडस्‌ तत्काळ कार्यान्वीत झालेत. मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांचे सहकार्य लाभले. रूग्णांवर सुसह्य उपचार व तातडीने बेड मिळावेत तसेच स्थानिक पातळीवर निर्णयासाठी आरोग्य निरीक्षकांची टीम पाठविण्याची विनंती आरोग्य मंत्र्यांना केली आहे.'' 

ते पुढे म्हणाले, ""मलेरिया, डेंगू, चिकणगुणिया व कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यासाठी स्वतंत्र आयसोलेशन विभागाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे. सिव्हीलच्या जुन्या इमारतीच्या देखभाल दुरूस्तीसाठी व नवीन इमारतीतील ओपीडी, रक्तपेढीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. त्याच्या मंजूरीचे आदेश वैद्यकिय शिक्षण मंत्र्यांनी केलेत. कोरोनामुळे रूग्ण मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. या मृत्यूंचे ऑडिट केल्यास तोडगा काढता येईल. काही खासगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात शुल्क घेतले जाते. महात्मा फुले योजनेतील काही त्रुटींमुळे दहा ते पंधरा टक्के रूग्णांनाच लाभ मिळतो. त्यासाठीे मंत्र्यांनी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.'' 

दोनशे ऑक्‍सिमीटर वितरीत करणार- 
पृथ्वीराज पाटील फौंडेशनतर्फे सलून असोसिएशन, हमाल पंचायत, वृत्तपत्र विक्रेते, दैनिक कार्यालये, बार असोसिएशन, भाजीपाला संघटना, व्यापारी संघटना आदींसाठी 200 ऑक्‍सीमीटर वितरित केले जातील. तसेच लॉकडाऊनमुळे नाभिक, रिक्षावाले, धोबी, फेरीवाले, दुकानदार आदींचे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 47 "ICU" beds operational in Civil Hospital: Prithviraj Patil ... Urgent decision of Medical Education Minister