सांगली : विट्यातील वृद्धाला ४८ लाखांना फसवले

दामदुपटीचे आमिष; पुण्यातील दोघांवर गुन्हा
crime
crimeSakal

विटा - कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दामदुप्पट रक्कम देतो, असे आमिष दाखवून विटा येथील वृद्धाची तब्बल ४८ लाख ४२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संशयित शहाजी केदार कदम व हेमंत शहाजी कदम (दोघे मूळ रा. तडसर, ता. कडेगाव, सध्या पुणे) यांच्याविरुद्ध विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश अनंतराव म्हेत्रे (यशवंतनगर, विटा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १ एप्रिल २०१२ ते ३१ जुलै २०१२ पर्यंत संशयित शहाजी कदम व हेमंत कदम हे दोघेजण श्री. म्हेत्रे यांच्या संपर्कात आले होते. पुणे येथे कदम यांच्या मालकीच्या श्री व्हर्टेक्स इंटरनॅशनल (बीपीओ) आणि व्हर्टेक्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन‌ कंपन्या असल्याची माहिती श्री. म्हेत्रे यांना दिली. या दोन्ही कंपन्यांचा विस्तार करायचा आहे, असे श्री. म्हेत्रे यांना सांगून त्यांचा विश्‍वास संपादन केला. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेची चोवीस महिन्यांमध्ये दामदुप्पट करून देतो, असे आमिष दाखवले.

दोघांबद्दल विश्‍वास वाटल्यामुळे श्री. म्हेत्रे व त्यांच्या कुटुंबीयांकडून २०१२ पासून आजअखेर बँकेतून तसेच रोख असे तब्बल ४८ लाख ४२ हजार रुपये घेतले. श्री. म्हेत्रे व इतरांनी रकमेबाबत सतत पाठपुरावा केला; परंतु सतत टोलवाटोलवी केली. भरलेली रकम अद्यापपर्यंत आणि आश्वासनाप्रमाणे परतावा न देता फसवणूक केल्याचे श्री. म्हेत्रे यांना लक्षात आले. त्यामुळे त्यांनी विटा पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघांविरूरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com