कर्‍हाडमध्ये सट्ट्याचा अड्डा उध्वस्त

सचिन शिंदे
मंगळवार, 15 मे 2018

कऱ्हाड - व्हीओ आयपीएल क्रीकेट स्पर्धेसाठी येथे सुरू असलेला सट्ट्याचा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला. त्यात पोलिसांनी पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख एक हजार रूपयांचा मु्देदमाल जप्त केला आहे. त्यामध्ये ब्याण्णव हजार सहाशे पाच रूपयांची रोख रक्कम जप्त केली. त्यात एक लाख आठ हजार रूपयांचे आठ मोबाईल संचही त्यांनी जप्त केले. सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरिक्षक पद्दमाकर घनवट यांनी येथील कोष्टी गल्लीत दुपारी तिनच्या सुमारास ही कारवाई केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप शशिकांत पवार (33,रविवार पेठ), अमोल संकर दावणे (29,रा. बाराडबरी परिसर झोपडपट्टी), विजय विलास चव्हाण (35), अमोल जयवंतराव पवार (35,दोघा रा. रविवार पेठ) व विजय विष्णू वायदंडे (35, रा. बुधवार पेठ) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. संदीप पवार हा सट्ट्याचा अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरिक्षक घनवट व त्यांच्या पथकाने आज दुपारी छापा टाकला. त्यावेळी संदीपने एका पडक्या घराच्या आडोशाला सट्टा घेत असल्याचे त्यांना आढळून आले. तेथे संदीपने आयपीलच्या एका सामन्यातील एका संघावर एक हजार रूपयास एक हजार रूपये परत अशा पद्धतीने विजीय होणाऱ्या संघावर पैज लावून पैसे स्विकारल्याचे छाप्यात समोर आले. त्याने स्विकारलेले पैसे जुगार पद्धतीचे होते. त्याशिवाय काही लोक तेथे जुगार खेळातानाही आढळले. 

त्यानुसार पोलिसांनी सट्ट्याचा जुगार अड्डा चालवणाऱ्या संदीप पवार याच्यासह खेळणाऱ्यांना अटक केली आहे. पोलिस निरिक्षक घनवट यांच्यासह सहायक पोलिस निरिक्षक विकास जाधव, सहायक फौजदार सुरेंद्र पानसांडे, हवालदार उत्तम दबडे, मुबीन मुलाणी, शरद बेंबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, मारूती लाटणे, निलेश काटकर, मयुर देशमुख, संजय जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: 5 arrested at gambling stand in karhad