पूरग्रस्त एसटी कर्मचाऱ्यांना पन्नास हजारांचे अल्पव्याजी कर्ज

पूरग्रस्त एसटी कर्मचाऱ्यांना पन्नास हजारांचे अल्पव्याजी कर्ज

मिरज - सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्त एसटी क‍र्मचाऱ्यांना  पन्नास हजारांचे कर्ज अत्यल्प व्याजामध्ये देण्याचा निर्णय एसटी सहकारी बॅंकेने घेतला आहे. त्यासाठी त्याची परतफेडीची क्षमता पाहिली जाणार नाही, असा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. 

एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे व महासचिव हनुमंतराव ताटे यांनी तीनही जिल्ह्यांतील पुरस्थितीची व नुकसानीची पाहणी केली. बाधीत झालेले एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन दिलासा दिला. उध्वस्त झालेल्या संसारांची दखल घेऊन मदतीची ग्वाही दिली.

एसटी सहकारी बँकेने पूरग्रस्त भागातील एसटी कर्मचाऱ्यांना मदत करावी, अशी विनंती संचालक मंडळाला केली. त्यावर संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घेतला. राज्यभरातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दहा लाख रुपयांची मदत घोषित केली. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्त कर्मचाऱ्यांची परतफेडीची क्षमता न पाहता 50 हजार रूपयांचे कर्ज अत्यल्प व्याजदराने जाहीर केले. यामुळे पूरग्रस्त एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यासाठी बॅंकेचे अध्यक्ष फळणीकर व व्यवस्थापकीय संचालक सुहास खासनीस यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून काम केले. एसटी कामगार संघटनेचे सांगली विभागाचे सचिव नारायणराव सूर्यंवशी, जिल्हाध्यक्ष अशोकराव खोत, कार्याध्यक्ष शमु मुल्ला, मिरज आगाराचे अध्यक्ष अफसर पटेल, सचिव दिलीप चौगुले, महिला आघाडीच्या ऊमा साळुंखे यांनी यासाठी संघटनेच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com