निपाणीत विधान परिषदेसाठी ५३४ मतदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निपाणीत विधान परिषदेसाठी ५३४ मतदार

निपाणीत विधान परिषदेसाठी ५३४ मतदार

sakal_logo
By
अमोल नागराळे

निपाणी : विधान परिषद निवडणुकीसाठी निपाणी तालुक्यात ५३४ मतदार मतदानासाठी पात्र आहेत. सध्या ६ जिल्हा, १६ तालुका पंचायत सदस्यांसह बोरगाव नगर पंचायतीच्या १७ सदस्यांचा कालावधी संपला आहे. त्यामुळे एकूण मतदारांमध्ये ३९ मतदारांची संख्या घटली आहे. तालुका निवडणूक विभागाने मतदारांची यादी बनवली असून ती निवडणूक आयोगाकडे सादर करण्याची तयारी सुरु केली आहे.

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था गटातील दोन जागांसाठी १० डिसेंबरला मतदान होत आहे. १६ नोव्हेंबरपासून या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. एकीकडे राजकीय हालचाली गतिमान झाल्या असतानाच प्रशासनाच्या पातळीवरही या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. या तयारीचा भाग म्हणून मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. ही यादी तयार आहे, पण आयोगाने अद्याक्षरांच्या क्रमानुसार तयार करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार ती बनवली जात आहे. तालुका पंचायत कार्यालयाकडून तालुक्यातील सर्व ग्राम पंचायत सदस्यांच्या यादी तीन दिवसापूर्वी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे दिली आहे.

हेही वाचा: सिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा; बंडाला अखेर मिळाला पूर्णविराम

निपाणी नगरपालिकेचे ३६ नगरसेवक आहेत. लोकनियुक्त व शासननियुक्त नगरसेवकांना विधान परिषदेला मतदान करता येणार आहे. बोरगाव येथे नगर पंचायत असली तरी तेथील नगरसेवकांचा कालावधी संपल्याने सध्या नगर पंचायतीचे सभागृह अस्तित्वात नाही. बोरगाव नगरपंचायतीत १७ नगरसेवकांच्या जागा आहेत. मात्र आता विधान परिषदेला या १७ जणांची घट झाली आहे. तालुक्यात २७ ग्राम पंचायती असून ४९८ एकूण ग्राम पंचायत सदस्य संख्या आहे. त्यापैकी एका सदस्याचा मृत्यू झाल्याने ४९७ सदस्यांना मतदान करता येणार आहे.

ग्राम पंचायतीत होणार मतदान

विधान परिषेदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातील मतदार मतदानासाठी पात्र आहेत. त्यामुळे ज्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदानासाठी बूथ असतील. तालुक्यातील २७ ग्राम पंचायतीत मतदानासाठी बूथ सज्ज ठेवले असल्याचे तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन उळागड्डी यांनी सांगितले.

"विधान परिषदेसाठी तालुक्यात ५३४ मतदार आहेत. त्यात निपाणी नगरपालिका व ग्राम पंचायत सदस्यांचा समावेश आहे. यादी निश्चित झाली असून बूथ उभारण्याची तयारी सुरु आहे. ज्या-त्या ग्राम पंचायतीत मतदान होईल. निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे तयारी सुरु आहे."

-डाॅ. मोहन भस्मे, तहसीलदार निपाणी

loading image
go to top