गल्लीबोळात सावकार पण परवानाधारक 550

परशुराम कोकणे
मंगळवार, 22 मे 2018

सोलापूर - सोलापूर शहरात कष्टकरी कामगारांचे प्रमाण अधिक असल्याने व्याजाने पैसे देणारे सावकार गल्लीबोळात आहेत. पैसे देताना कोरे धनादेश घेणे, बॉण्डवर लिहून घेणे, जागेची कागदपत्रे ठेवून घेतली जात आहेत. शहर उपनिबंधक कार्यालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शहरात 550 सावकार परवानाधारक आहेत. 

सोलापूर - सोलापूर शहरात कष्टकरी कामगारांचे प्रमाण अधिक असल्याने व्याजाने पैसे देणारे सावकार गल्लीबोळात आहेत. पैसे देताना कोरे धनादेश घेणे, बॉण्डवर लिहून घेणे, जागेची कागदपत्रे ठेवून घेतली जात आहेत. शहर उपनिबंधक कार्यालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शहरात 550 सावकार परवानाधारक आहेत. 

म्होरक्‍या चित्रपटाचे निर्माते कल्याण पडाल यांनी खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून गेल्या आठवड्यात आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर खासगी सावकारांकडून होणारी पिळवणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सावकारी व्यवसाय करण्यासाठी शहर उपनिबंधक कार्यालयाकडून परवाना घ्यावा लागतो. सोलापुरात 550 जणांनी परवाना घेतला आहे. सध्या परवाना नूतनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नियमानुसार शासनाने ठरवून दिलेल्या व्याजदरानेच पैसे द्यावे लागतात. खासगी सावकाराकडून पैसे घेताना कोरे धनादेश, जागेची कागदपत्रे गहाण म्हणून ठेवली जातात. त्यातूनच पुढे पैशांसाठी त्रास दिला जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

आकडे बोलतात.. 

  • परवानाधारक सावकार : 550 
  • पोलिसांकडे तक्रारी : 34 
  • तक्रारींचे निवारण : 29 
  • गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेत : 2 
  • (ही आकडेवारी 1 जानेवारी 2018 पासूनची आहे.) 
  • वर्षभरात उपनिबंधक कार्यालयाकडून छापे : 17 
  • अवैध सावकारी करणाऱ्यांवर गुन्हे : 19 

सोलापूर शहरात घराघरांत सावकार असल्यासारखी स्थिती आहे. आमच्याकडे तक्रार आल्यानंतर कागदपत्रांची तपासणी केली जाते. अनेकजणांकडे सावकाराकडून पैसे घेतल्याच्या, कागदपत्रे दिल्याच्या नोंदी नसतात. नागरिकांनी परवानाधारक सावकारांकडूनच पैसे घ्यावेत. सर्व कागदपत्रे सांभाळून ठेवावीत.
- नितीन थेटे, प्रमुख, सावकार विरोधी पथक 

अवैध सावकारीप्रकरणात गेल्या वर्षभरात 17 ठिकाणी छापे टाकून 19 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. नागरिकांनी परवानाधारक सावकारांकडून शासनाने ठरवून दिलेल्या व्याजदराप्रमाणे पैसे घ्यावेत. जर कोणी अवैध पद्धतीने सावकारी करत असेल, पैशासाठी त्रास देत असेल तर तत्काळ तक्रार करावी. 
- कुंदन भोळे, शहर उपनिबंधक

Web Title: 550 Licensee savkar in solapur