सांगलीत 580 शाळा उघडल्या : 27 हजार विद्यार्थ्यांची हजेरी

580 schools opened in Sangli: Attendance of 27 thousand students
580 schools opened in Sangli: Attendance of 27 thousand students

सांगली : कोरोना संकटकाळात तब्बल आठ महिने बंद असलेली शाळा आज सुरू झाली. 750 पैकी 580 शाळा उघडल्या गेल्या. त्यात 27 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. कोरोना संकटातील संपूर्ण उपाययोजना करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना थोडा विश्‍वास देऊन अध्यापन कार्याला सुरवात झाली. 

जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या 750 शाळा आहेत. तेथे 1 लाख 47 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी किती शाळा पहिल्या दिवशी उघडणार, पालक संमतिपत्र देणार का, याकडे लक्ष लागले होते. एक आड एक दिवस विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले आहे.

त्यामुळे पहिल्या दिवशीची 27 हजार विद्यार्थ्यांची हजेरी ही एकूण प्रमाणात 18 टक्के इतकी आहे. उद्या (ता. 24) इतकेच विद्यार्थी येतील, अशी अपेक्षा आहे. पुढील काही दिवस पालक एक अंदाज घेतील आणि शाळा सुरळीत सुरु होतील, अशी अपेक्षा शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केली आहे. 

विद्यार्थ्यांनी रांगा लावून हातावर सॅनिटायझर घेतले. मास्क वापरले. वर्गात जाण्याआधी त्यांचा ताप तपासण्यात आला. शंका आली तर विद्यार्थ्याला घरी पाठवण्यात आले. जेवणाची सुटी घेतली गेली नाही. पाण्याची बाटली प्रत्येकाने स्वतःची आणली. मुलांनी एकमेकांकडे तोंड करून बोलू नये, याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. मास्क अजिबात काढू नका, प्रकृतीविषयी शंका आली तर घरीच थांबा, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी केले. 

पालकांनी चिंता न करता खबरदारीचे सर्व उपाय करावेत

शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची योग्य काळजी शिक्षक घेत आहेत. विद्यार्थ्यांनीही या प्रक्रियेत शंभर टक्के सहकार्य करावे. पालकांनी चिंता न करता खबरदारीचे सर्व उपाय करावेत. या संकटातून पुन्हा एकदा शिक्षण प्रक्रिया सुरळीत करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल, असा निर्धार करूया. 
- सुधाकर तेलंग, माध्यमिक शिक्षणाधिकारी 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com