पंढरपूरच्या नगरसेवकासह 6 जणांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

सांगली - येथील कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर चौकात आपल्यावर गोळीबार झाल्याचा दावा करणारा अक्षय ऊर्फ बबलू धनंजय सुरवसे (वय 22, मूळ पंढरपूर) हा एका खुनातील संशयित असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. गोळीबारप्रकरणी त्याने पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार, अर्जुन पवार, सचिन चौगुले, भैया पवार, नागेश धोत्रे, रामा पवार (पंढरपूर) या सहाजणांविरुद्ध संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार फिर्याद व गुन्हाही दाखल आहे. गोळीबार झाला त्या ठिकाणी आज बॉम्ब शोधक पथकाने शोध घेतला. परंतु कसलाही पुरावा मिळाला नाही. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पंढरपूरहून दीड वर्षापूर्वी सांगलीतील दत्तनगर येथे मामाकडे राहण्यास आलेल्या बबलू सुरवसे याची पार्श्‍वभूमी गुंडगिरीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंढरपूर येथील निलेश चंद्रकांत माने (वय 20, गवंडी गल्ली, पंढरपूर) याच्यावर 28 मे 2015 रोजी चळे पाटी रस्त्यावर "तू आमच्या ग्रुपच्या बातम्या विरोधकांना का सांगतोस' म्हणून हल्ला केला होता. 14 जणांनी निलेशवर हल्ला केल्यानंतर तो बेशुद्ध पडला. जखमी निलेशला काहींनी तेथील जनकल्याण हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्‍टरांनी तपासल्यानंतर निलेश मृत झाल्याचे घोषित केले. तेव्हा दाखल करणारे पळून गेले. पंढरपूर शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला. त्यात अक्षय ऊर्फ बबलू सुरवसेसह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संशयितांना तेव्हा अटकही केली. खून खटल्याची सुनावणी सुरू आहे. 

दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर बबलू सांगलीतील मामाकडे राहण्यास आला होता. सांगली-कर्नाळ रस्त्यावर दत्तनगर येथील मामाचा बांबू डेपो तो सांभाळत होता. काल दुपारी पावणेबाराच्या सुमारास डेपो बंद करून सांगलीकडे येत असताना डेपोजवळच गोवर्धन चौकात दुचाकीवरून आलेल्या सहा जणांपैकी एकाने सिल्व्हर रंगाचे रिव्हॉल्व्हर काढून गोळीबार केला. परंतु मागे वाकून गोळी चुकवली. त्यानंतर दुचाकी मारेकऱ्यांच्या अंगावर टाकून पळाल्याचे बबलूने पोलिसांना सांगितले. काल रात्री उशिरा पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली आहे. त्यात पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार, अर्जुन पवार, सचिन चौगुले, भैया पवार, नागेश धोत्रे, रामा पवार यांच्याविरुद्ध संशय व्यक्त केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील मासाळकर तपास करीत आहेत. 

बॉम्ब शोधक पथकाची तपासणी 
दत्तनगर येथे ज्या ठिकाणी गोळीबार झाला, असे बबलूने सांगितले, त्या ठिकाणी आज बॉम्बशोधक पथकाने तपासणी केली. गोळीबारानंतर उडालेले काडतूस किंवा अन्य पुरावा मिळतो काय? याचा शोध घेतला. परंतु कोणताही पुरावा हाती लागला नाही. 

पूर्ववैमनस्यातून प्रकार? 
पंढरपूर येथील निलेश माने खून प्रकरणात बबलू सुरवसे संशयित आहे. मृत निलेश एका नगरसेवक गटाचा समर्थक होता. दोन गटातील संघर्षातून निलेशवर हल्ला झाला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. खुनानंतरही पंढरपूर परिसरात धुसफूस सुरूच आहे. पूर्ववैमनस्यातूनच नगरसेवक संदीप पवार आणि साथीदारांनी गोळीबार केल्याचा संशय बबलूने व्यक्त केला आहे. परंतु तो कितपत खरी माहिती सांगतो, याचा पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: 6 cases of crime with corporator Pandharpur