साताऱ्यात 60 लाखांच्या नव्या नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

विभागाच्या मदतीने पुढील चौकशी सुरु असल्याचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. ३० टक्के दराने ते नोटा बदलुन देत असल्यांचे समोर आले आहे. अशा प्रकारे  नोटा बदलणारांची माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस पोलिस अधिक्षकांनी जाहिर केले.

सातारा - पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देणाऱ्या तिघांना आज (मंगळवार) सकाळी सातारामधून अटक करण्यात आली. यांच्याकडून 60 लाख रुपयांच्या दोन हजारांच्या नव्या नोटा जप्त कऱण्यात आल्या आहेत. कोल्हापूरमधील तिघांना अटक करण्यात आली आहे.

सागर दत्तात्रय आरडे, भगवान बिराप्पा भोपळे (राजारामपुरी कोल्हापुर) उमेश कांबळे (कोळे, ता. कराड) हे तिघे होंडा सीटी गाडीतून साताऱ्यातील बॅाम्बे रेस्टॅारंट चौकात आले होते.   जुन्या नोटा बदलुन देण्यासाठी ते आले होते. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक पदमाकर घनवट यांना मिळाली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले.  त्यांच्याकडुन ६० लाख रुपए किमतीच्या २ हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. प्राप्तीकर

विभागाच्या मदतीने पुढील चौकशी सुरु असल्याचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. ३० टक्के दराने ते नोटा बदलुन देत असल्यांचे समोर आले आहे. अशा प्रकारे नोटा बदलणारांची माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस पोलिस अधिक्षकांनी जाहिर केले.

Web Title: 60 lakh cash seized in Satara