अतिवृष्टी पीकहानी भरपाईत ६० ते ८० टक्के वाढ

पावसाळी पीक नुकसान भरपाई दुप्पट करण्यात आल्याची घोषणा झाली
60 to 80 percent increase heavy rainfall crop loss compensation belgaum
60 to 80 percent increase heavy rainfall crop loss compensation belgaum sakal

बेळगाव : अतिवृष्टीत खासगी मालमत्ता हानी मोबदल्यात वाढीव भरपाई राज्य शासनाने जाहीर केली आहे. त्या धर्तीवर पीक नुकसान भरपाई वाढवली. पावसाळी पीक नुकसान भरपाई दुप्पट करण्यात आल्याची घोषणा झाली आहे. पाणथळ जमिनीत पीकहानी मोबदल्यात सुमारे ८० टक्के, बहुवार्षिक पीक नुकसान मोबदल्यात ६० टक्के वाढीव भरपाई जाहीर झाली. अतिवृष्टीत घर, गृहोपयोगी साहित्य किंवा नैसर्गिक आपत्तीत मृत्यूला तुटपुंजी भरपाई मिळते. त्यामुळे भरपाई वाढविण्याची मागणी आहे. याची गंभीर दखल माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या कार्यकाळात घेतली आणि श्रेणीनिहाय भरपाई वाढविण्यात आली.

याप्रमाणे २०१९ पासून भरपाई या निकषावर भरपाई मिळत असून, यंदा विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्याची घोषणा दोन दिवसांपासून केली आहे. यानुसार पीक नुकसान भरपाईच्या घोषणेकडे लक्ष होते. त्याची घोषणा केली असून, त्यात पावसाळी आधारित पिकाचे अतिवृष्टीत नुकसान झाल्यास एसडीआएफ (स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स), एनडीआरएफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) नियमावलीनुसार सहा हजार ८०० रुपये भरपाई प्रतिहेक्टर मिळते. पण, राज्य शासनाने वाढीव भरपाई जाहीर केली आहे. सहा हजार ८०० रुपये वाढीव भरपाई दिली जाईल, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपये भरपाई मिळेल.

सुपीक आणि पाणथळ जमिनीतील पीकहानी सुमारे ८० टक्के भरवाई वाढविली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ नियमानुसार १३ हजार ५०० रुपये भरपाई मिळते. यात ११ हजार ५०० रुपये वाढीव भरपाई दिली जाईल. यामुळे दोन्ही मिळून २५ हजार रुपये प्रतिहेक्टर भरपाई मिळेल. राज्यातील काही जिल्ह्यांत वर्षाला दोन ते तीन स्वरूपाची पिके घेण्यात येतात. या स्वरूपाच्या पीकहानीत ६० टक्के भरपाई वाढ केली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ नियमाप्रमाणे १० हजार रुपये भरपाई मिळते. त्यात १० हजार रुपये वाढ जाहीर केली आहे. यामुळे दोन्ही मिळून एकत्रित २० हजार भरपाई मिळेल.

अतिवृष्टीत घराची भागशः, अंशतः आणि पूर्ण पडझड मोबदल्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफ नियमावलीपेक्षा अधिक भरपाई गेल्या आठवड्यात घोषित केली आहे. या धर्तीवर आता पीक भरपाईची रक्कम वाढविण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे अतिवृष्टीने हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

नियमावलीत सुधारणा जरुरी

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती एनडीआरएफ, एसडीआरएफ नियमावलीनुसार पीक नुकसान भरपाई अत्यल्प मिळते. ती वाढवली जावी, अशी मागणी आहे. पण, त्यावर निर्णय प्रलंबित आहे. यामुळे भरपाई कमी मिळते.

एक नजर

पीकहानीचे स्वरूप - एनडीआरएफ, एसडीआरएफ भरपाई - वाढीव भरपाई - एकूण

पावसावर आधारित पीकहानी - ६,८०० - ६८०० - १३,६००

पाणथळ जमिनीतील पीकहानी - १३,५०० - ११,५०० - २५,०००

बहुवार्षिक पीकहानी - १८,००० - १०,००० - २८,०००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com